क्रांतिसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळ व संतोष भाऊ मित्र मंडळ यांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार जाहीर

मुख्य संपादक 
विनोद पोतदार

पंढरपूर क्रांतिसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळ व संतोषभाऊ मित्र मंडळ यांच्यावतीने श्री संतोष नेहतराव, श्री अमोल नागटिळक श्री सुरेश नेहतराव यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरात नवरात्र उत्सवनिमित्त विविध कार्यक्रम आयोजन करण्यात येते. त्यामध्ये डान्स स्पर्धा असतील, भजन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, रक्तदान शिबिर, होम मिनिस्टर स्पर्धा, महाआरतीचे सुद्धा आयोजन करण्यात येते व समाजामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती, सामाजिक संस्था,  व प्रशासनातील अधिकारी यांचाही गौरव मंडळाच्यावतीने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो यंदाही सदरचे पुरस्कार मंगळवार दि.4 ऑक्टोंबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता देण्यात येणार आहेत.
त्यामध्ये यावर्षी सामाजिक गौरव पुरस्कारांमध्ये मोहन अनपट, अमर पाटील, सचिन कांबळे, डॉ. बजरंग धोत्रे,डॉ.बी.पी. रोंगे सर व सौ.अमरजा जोशी यांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे देशात व महाराष्ट्रात गेली दोन वर्ष कोरोनाचे संकट आले असताना या संकटातून सर्वसामान्य जनतेला सुरक्षित ठेवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे त्यामध्ये माजी प्रांताधिकारी सचिन ढोले, पंढरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम , पंढरपूरचे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर ,पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले,  पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांचा सन्मान होणार आहे. त्याबरोबरच पंढरपूर शहरात आपल्या कार्य कर्तृत्वाने समाजातील नागरिकांना कायमस्वरूपी त्यांच्या मदतीला धावून जाणारे  अरुणकोळी ,संजय  ननवरे, कृष्णा वाघमारे, सलमान आतार, मुजमिल कमलीवाले,सुरज राठी,  विशाल आर्वे, पांडुरंग सावंतराव, विष्णू शेटे, व कुमारी माही परचंडे यांना कार्य गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष निखिल नेहतराव, सचिव श्रीकांत शिंदे, उपाध्यक्ष अमोल परबतराव व खजिनदार किरण माने यांनी दिली

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form