पंढरपूर शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘सेवा पंधरवडा’ या 15 दिवसांच्या सेवा अभियानाची सुरुवात मा.आ.प्रशांत परिचारक
पंढरपूर ----(विनोद पोतदार)
देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पंढरपूर शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘सेवा पंधरवडा’ या 15 दिवसांच्या सेवा अभियानाची सुरुवात मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती, पंढरपूर येथे भव्य रक्तदान शिबिर घेऊन करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी समर्पण म्हणून रक्तदान केले. यानिमित्त सेवा पंधरवड्यात विविध शिबीराचे, समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यात महाआरोग्य शिबीराचे आयोजन, पंढरपूर शहरातील स्मशान भुमी व यमाई तलाव स्वच्छता अभियान, पंढरपूर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी महावृक्षारोपन संकल्प, भाजपा ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून अंध शाळा, अपंग शाळा व वृद्धाश्रम येथे मोफत सलुन सेवा, लहान मुलांमध्ये आढळणाऱ्या विविध रोगांवर आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन, "कॅन्सर मुक्त पंढरपूर" यां अंर्तगत कॅन्सर तपासणी व उपचारांचे शिबीर, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पंतप्रधान नरेंद मोदीजी यांनी गरिबांसाठी तयार केलेल्या विविध कल्याणकारी योजनांचा सजीव देखावा "पथनाट्य" इत्यादी उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्याचे नियोजन आहे. "अंत्योदय" या संकल्पने विषयी जनजागृती करण्यात येणार आहे. शहरात किंवा तालुक्यात शेतकरी धन, पशुपालकांचा लंपी या आजारावर मेळावा घेण्यात येणार आहे.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप आप्पा घाडगे, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे, जि.प.सदस्य वसंतनाना देशमुख, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट, श्री पांडुरंग कारखान्याचे संचालक हरीष दादा गायकवाड, भा.ज.पा अनुसूचित जा.मो.जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण तात्या धनवडे, भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, प्रणव परिचारक, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब माळी, बाळासाहेब यलमर, संतोष घोडके, भगवान चौगुले, सुरेश टिकोरे, चांगदेव कांबळे, भाजपा शहराध्यक्ष विक्रम शिरसट, भाजपा युवामोर्चा तालुका अध्यक्ष सुनिल भोसले, भाजपा शहर युवामोर्चा रोहित पानकर, गणेश अधटराव, अनिल अंभगराव, निलराज डोंबे, संजय निंबाळकर, सुजीतकुमार सर्वगोड, गुरूदास अभ्यंकर, सुभाष मस्के, माऊली हळणवर, संदिप माने, धर्मराज घोडके, इब्राहिम बोहरी, अमोल डोके, बसवेश्वर देवमारे, विजय वरपे, जगदिश जोजारे, शिवाजी अलंकार, नारायण शिंघण, विशाल मलपे, सेवा पंधरवडा अभियानाचे संयोजक अक्षय वाडकर, दिपक येळे, प्रसाद सापनेकर, सुरेश देशमुख, बाळासाहेब आरकिले, विवेक कचरे, आबा झेंड, धिरज म्हमाणे, गणेश शिंघण, आण्णा धोत्रे, भाऊ टमटम, राहुल परंचडे इत्यादी पदाधिकारी व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.