पंढरपूर: (विनोद पोतदार)
रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्याकडून पर्यावरण पूरक घरी बनविलेल्या गणपती मुर्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती पंढरपूर रोटरी क्लबचे अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
यामध्ये गणपतीची मुर्ती ही घरी शाडूने किंवा कागदाने बनवलेली असणे आवश्यक आहे. यामध्ये प्लास्टिक किंवा तस्सम गोष्टीचा वापर नसावा. मुर्ती सजावट मध्ये पर्यावरण पूरक साहित्याचा वापर असणे आवश्यक आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छुक स्पर्धेकांना आपल्या घरातील गणेश मूर्तीचा फोटो दिनांक ७ सप्टेंबर २०२२ रोजी डाॅ. संगिता पाटील-९५७९३२६४००, डाॅ. क्षितिजा पाटील- ९४०३६८८९३८, रो. वर्षा पाटील-९४२१०४२३०० या नंबर वरील व्हटसप वर पाठवावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांच्याकडून करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धेकांना नियम व शर्ती लागू राहतील.