भाळवणी पारंपारिक पद्धतीने बैलगाडीतून गणेशाचे विसर्जन

भाळवणीत पारंपारिक पद्धतीने श्री गणेशाचे विसर्जन 


पंढरपूर -----
  तालुक्यातील भाळवणी येथील श्री गणेश तरुण मंडळांनी श्री गणेशाचे विसर्जन पारंपारिक पद्धतीने केल्यामुळे कौतुक केले जात आहे.
भाळवणी येथील सर्वात मानाचा असा जय भवानी तरुण  मंडळाच्या गणेश मूर्तीची मिरवणूक बैलगाडीतून काढण्यात आली होती. त्याचबरोबर पारंपारिक अशा लेझीम पथकाच्या सहभागात मिरवणूक मोठ्या थाटामाटात करण्यात आली होती.
याविषयी मंडळाचे अध्यक्ष अभिषेक कारंडे म्हणाले की सध्या तरुणांना डॉल्बी लावून श्री गणेशाची मिरवणूक काढत आहेत. पण या डॉल्बीमुळे अनेक वाईट परिणाम होत असल्यामुळे आमच्या मंडळातील सर्व सदस्यांनी हा खर्च कमी करून बैलगाडीतून श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही बैलगाडीतून श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक काढली त्यामुळे आमच्या मंडळाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अशीच सर्व मंडळांनी पारंपारिक पद्धतीने गणेश विसर्जन करून प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती  केली.


Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form