यश पब्लिक स्कूलमध्ये गणेशोत्सव साजरा

 

पंढरपूर---(विनोद पोतदार)
समाजामध्ये एकोपा वाढवा या दृष्टिकोन  सुरू करण्यात आलेल्या गणेशोत्सवा प्रमाणे विद्यार्थ्यांमध्येही  समतेची व एकतेची भावना रुजविण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील यश पब्लिक स्कूलच्या वतीने  गणोशोत्सव साजरा करून विविध उपक्रम राबविले.
या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या बुध्दीला आणि कलेला वाव मिळावा म्हणून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तर यावेळी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करून क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांकडूनच  दररोज गणरायाची आरती करून घेतल्याने विद्यार्थ्यांना त्याचा प्रसन्न अनुभव मिळाला. विसर्जनाच्या दिवशी विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देण्यात येवून शाळेच्या परिसरामध्ये  विर्सजन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मोठय़ा भक्तीभावाने गणेशाचे विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सव काळामध्ये शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे शाळेतील प्रांगण भक्तीमय झाले होते.
हा गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थेचे मार्गदर्शक पोलीस अधिकारी दशरथ पाटील, संस्थेच्या अध्यक्षा सौ.प्रगती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्याक सचिन लोखंडे, शिक्षीका भारती देशमुख, रेश्मा  मेहर, अश्विनी पवार,  सोनाली चव्हाण, अश्विनी  जानकर, शिक्षक सत्यवान लोखंडे, कल्याण मसवडे, कर्मचारी सुतार, समीर गोरे आदींनी  विशेष परिश्रम  घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form