पंढरपूर शहरात गणेशोत्सवानंतर गरबा, दांडिया सराव क्लास, स्पर्धाचे आयोजन
पंढरपूर ----(विनोद पोतदार)
गरबा हा नवरात्रात सादर होणारा एक पारंपरिक नृत्यप्रकार आहे. भारतातील गुजरात प्रांतात हा प्रकार शारदीय नवरात्र काळात विशेषत्वाने खेळला जातो. हे नाव संस्कृतमधील दीपगर्भ या शब्दापासून तयार झाले आहे. महिलांचा या नृत्यात विशेष सहभाग असतो. काहीवेळा देवीला वंदन करण्यासाठी पुरुष सुद्धा या नृत्यात सहभागी होतात
गणेशोत्सव संपताच नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. शहरामध्ये गरबा, दांडियाचे क्लासेस सुरू झाले असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे गरबा, दांडिया या नवरात्र उत्सवात क्लासेस व स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत .
शहरात अनेक वर्षांपासून गरबा, दांडिया खेळाची नवरात्र उत्सवातील या परंपरा जिवंत ठेवली आहे,डान्स अकॅडमीच्या माध्यमातून तरुणाई क्लासेसमध्ये नावनोंदणी करीत आहेत आणि विविध डान्स शिकत आहेत
यामध्ये महिला, तरुणाई गरबा खेळताना घागरा,चोली, ओढणी परिधान करतात तर पुरुष धोती आणि कुर्ता हा पारंपरिक पद्धतीचा पेहराव करून या खेळामध्ये सहभागी होतात.या खेळाचे तरुणाईला विशेष आकर्षण असते.