सावंत व साठे दोघेही शिंदे गटाचे शिवसैनिक परंतु निवडीवरून गटबाजी चव्हाट्यावर!
पंढरपूर (प्रतिनिधी)
सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन आणि सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कल्याणराव काळे यांच्या खास चेल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामावून घेण्यात आले आहे. सरकार शिरोमणी कारखान्याचे संचालक आणि कल्याणराव काळे यांचे खंदे समर्थक, सुधाकर कवडे यांना शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख पद बहाल करण्यात आले आहे. पंढरपूरमधील पत्रकार परिषदेत संपर्कप्रमुख महेश साठे आणि संजय बाबा कोकाटे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे. यामुळे कल्याणराव काळे यांच्या पक्षबदलाविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
पंढरपूर तालुक्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मध्ये संभ्रमाचे वातावरण आहे कारण हि तसेच पंढरपूर येथील आरोग्य मंत्री दौऱ्यात साठे यांची व त्यांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग नव्हता तर साठे यांच्या निवडीचे पत्र मिळाल्यावर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे त्यामुळे सर्वसामान्य शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते व सर्व सामान्य शिवसैनिक अस्वस्थ दिसत आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथे सावंत गटाच्या लोकांनी ठाण मांडून पद घेत आहेत अशी माहिती आहे
मागील काही दिवसात राज्यात राजकीय उलथापालथ झाली. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन, शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आले. मागील काही दिवसांपूर्वीच भाजपामधून राष्ट्रवादीत आलेले कल्याणराव काळे यांना आता भाजपामध्ये प्रवेश मिळणे शक्य नाही. यामुळेच त्यांनी नवीन एकनाथ शिंदे गटाची मनधरणी सुरू केली होती. सांगोल्याचे आ. शहाजी पाटील यांच्या मध्यस्थीने शिंदे गटात प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. स्वतः प्रवेश करण्यापूर्वी आपली कुमक त्या गटात पाठवणे, या स्वरूपाचे राजकारण त्यांनी सुधाकर कवडे यांच्या माध्यमातून केल्याचे दिसत आहे.
१६ सप्टेंबर रोजी पहाटे सोलापूर जिल्ह्यातील सहा निवडी जाहीर करण्यात आल्या. संजय कोकाटे यांना माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख, महेश साठे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुखपदी नेमण्यात आले. याचवेळी कल्याणराव काळे यांचे कट्टर समर्थक सुधाकर कवडे यांना माढा लोकसभा मतदारसंघाचे सहसंपर्कप्रमुख म्हणून नेमण्यात आले. रविवारी पंढरपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना साठे आणि कोकाटे यांच्या शुभहस्ते नेमणूकपत्र देण्यात आले.
शिवसेनेच्या शिंदे गटात जिल्हा सहसंपर्कप्रमुख म्हणून कल्याणराव काळे यांचे कट्टर समर्थक सुधाकर कवडे यांची नेमणूक करण्यात आली. त्यांच्या नेमणुकीपासूनच कल्याणराव काळे यांच्या राजकीय वळणाविषयी चर्चा सुरू झाली. कल्याणराव काळे यांना पक्षबदलाचे कोणतेही सोयरसुतक नाही. आजही त्यांचे समर्थक राष्ट्रवादी, काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, एवढेच नव्हे तर विठ्ठल साखर कारखान्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. ३० ते ४० टक्के समर्थक त्यांना सोडून दुसऱ्या गटात गेले आहेत. आता त्यांचे काळीजंच ( सुधाकर कवडे)
एकनाथ शिंदे गटात गेल्यामुळे, कल्याणराव काळे यांच्या राजकारणाविषयी वेगवेगळी चर्चा होऊ लागली आहे.