मा.आ.श्री प्रशांतराव परिचारक यांना "साखर उद्योग गौरव पुरस्कार" प्रदान

डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन इंडिया या संस्थेचा "साखर उद्योग गौरव पुरस्कार"


पंढरपूर ------
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक (मालक) यांना साखर उद्योगामध्ये केलेल्या भरीव कामगिरीमुळे डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन इंडिया या संस्थेचा "साखर उद्योग गौरव पुरस्कार" मिळाला असून. सदर पुरस्काराचे वितरण आज रोजी पुणे येथे मा.खा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला यावेळी मा ना श्री जयंत पाटील ,साखर आयुक्त मा श्री शेखर गायकवाड, DSTA चे अध्यक्ष एस एस गंगवती ,मा श्री एस एस भड ,कारखान्याचे संचालक  मा श्री उमेशराव परिचारक कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदि उपस्थित होते.
डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन इंडिया हि संस्था देशपातळीवर साखर उद्योगांमध्ये काम करीत असून प्रत्येक वर्षी साखर उद्योगामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यास विविध पुरस्कार देऊन सन्मान करीत असते श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सन 2022 मध्ये उत्कृष्ट कामकाज केले असुन साखर उताऱ्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे तसेच ऊस गाळप व साखर उत्पादनामध्ये ही कारखान्याने यावर्षी उच्चांक निर्माण केले आहेत. कारखान्याने उभारलेला को-जन प्रकल्प, डिस्टिलरी प्रकल्प, सौर उर्जा प्रकल्प, ऑक्सिजन प्लॉन्ट, बायो फर्टिलायझर लँब, माती पाणी परिक्षण प्रयोगशाळा इत्यादी प्रकल्प व्यवस्थित चालवून त्यामधुनही उच्चांकी उत्पादन घेतले आहे. कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक (मालक) यांनी कारखान्याच्या चेअरमन पदाची जबाबदारी स्विकारलेनंतर कारखान्याची घौडदौड सुरु असून ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेवून त्यांचे  हित जोपासले आहे.
           
श्रध्देय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांनी घालुन दिलेल्या आदर्शानुसार त्यांचाच पध्दतीने कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक (मालक) हे देखील कारखानदारीमध्ये विविध योजना आणून त्या पुर्णत्वास नेत आहेत. याचाच परिपाक म्हणून त्यांना डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन इंडियाचा मानाचा समजला जाणारा "साखर उद्योग गौरव पुरस्कार"  मिळाला आहे. 
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.श्री. कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, श्री. दिनकराव मोरे, श्री. वसंतराव देशमुख, श्री. हरीष दादा गायकवाड, श्री. उमेशराव परिचारक, श्री रोहन परीचारक श्री. ज्ञानदेव ढोबळे, श्री. भगवानराव चौगुले, श्री.लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, गंगा मामा विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हणमंत कदम, शामराव साळुंखे, श्री.राणू पाटील, हरिष ताठे, उमेश विरधे आदि उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form