सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगे गावातील घडली घटना
पंढरपूर ----
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगे गावात मुलं चोरीच्या संशयावरून यूपीतील 4 साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केली कार्यवाही केली
या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. तर सांगली पोलिसाकडून तपास सुरू आहे. सांगलीच्या एसपींनी सांगितले की, हे चारही साधू यूपीचे रहिवासी असून ते पंढरपूरला दर्शनासाठी जात होते. येथील स्थानिक लोकांना त्यांची भाषा समजू शकली नाही, त्यामुळे लोकांनी त्यांना मूलं चोरणारे समजून मारहाण केली.
लोकांनी साधूंना मारहाण केल्याचे पोलिस
सांगत असून स्थानिक पोलिस स्टेशनच्या
पोलिसांनी त्यांच्यावर उपचार केले, मात्र
तक्रार न देता ते निघून गेले आणि लेखी
तक्रार न मिळाल्याने पोलिसांनी मारहाण
करणाऱ्यांना ना अटक केली ना त्यांच्यावर
कारवाई केली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर
जिल्ह्याच्या एसपींनीही खुलासा देऊन
चौकशी करू असे सांगितले आहे.