आज पंढरीत * हिंदु गर्व गर्जना अभियान मेळावा *उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांच्या उपस्थितीत

हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित हिंदु धर्माच्या प्रसारासाठी हे अभियान
पंढरपूर ---(विनोद पोतदार)



पंढरपूर  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यभर हिंदु गर्व गर्जना अभियान राबविण्यात येत आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित हिंदु धर्माच्या प्रसारासाठी हे अभियान प्रत्येक जिल्हयामध्ये मेळाव्याच्या रुपाने राबविण्यात येत आहे. सोलापूर जिल्हयामध्ये हे अभियान आज मंगळवारी पंढरपूर येथील श्रीयश पॅलेस येथे आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याह राज्याचे            
        
 उत्पादन शुल्क मंत्री   शंभुराजे देसाई यांचे उपस्थितीमध्ये हे अभियान होणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या माध्यमातून हिंदु धर्माचे उदात्तीकरण केले आहे. त्याच विचाराने पक्ष विस्तार करण्यास मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केली आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्हयामध्ये हिंदु गर्व गर्जना अभियान राबविण्यात

येत आहे. सोलापूर जिल्हयातील सभेचे आयोजन उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांचे उपस्थितीमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यासाठी आ. शहाजीबापू पाटील, शिवाजीराव सावंत,  महेश साठे, संजय कोकाटे, सुधाकर कवडे, अमोल शिंदे, महेश चिवटे, महेश काळजे, चरणराज चवरे, लक्ष्मीकांत ठोंगे, प्रशांत भोसले, महावीर देशमुख, शिवाजी बाबर, अभय देशमुख, वैभव मोरे, विनोद पाटील, रामचंद्र टकले, महादेव आयरे हे उपस्थित राहणार आहेत. राज्यात सत्तांतर झालेनंतर प्रशासकीय काम बरोबर पक्षबांधणीसाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली आहे. कार्यकर्त्यांची मजबुत फळी निर्माण करण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यासाठी शिवसैनिक मोठया संख्येनी उपस्थित रहावे असे आवाहन   महेश साठे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form