शिवतीर्थवरच दसरा मेळावा होणार..... हायकोर्टाच्या निर्णयाने पंढरपूरातील शिवसैनिकात नवचैतन्य

अखेर सत्याचाच विजय...


पंढरपूर ---(विनोद पोतदार)

पंढरपूर शहर व तालुक्यातील  शिवसैनिकांचा हायकोर्टाच्या निर्माणचे जल्लोषात स्वागत केले छत्रपती शिवाजी चौक येथे पंढरपूर येथील शहर ठाकरे शिवसैनिकांनी व पदाधिकारी यांनी तर तालुक्यातील ठाकरे शिवसैनिकांनी सावरकर चौक, तहसील कार्यालय, शिवाजी चौक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर संत नामदेव पायरी जवळ फटक्यांची आतिषबाजी करून व पेढे वाटून आनंद साजरा केला. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करताना मोठा जल्लोष केला सत्याचा नेहमी विजय होतो असे म्हणत यांनी न्यायालयीन निर्णयाचे  स्वागत केला आहे. यावेळी शहर व तालुक्यातील शिवसैनिक, पदाधिकारी, युवा सेनेचे कार्यकर्ते ,शिवसेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महिलांनी ,युवा, युवती,शिवप्रेमी सर्वसामान्य नागरिकांनी यात सहभाग घेऊन आनंद उत्सव साजरा केला , याप्रसंगी जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. पंढरपूर शहर व तालुक्यातील  बहुसंख्य  शिवसैनिक मेळाव्यात सहभागी होणार आहेत .

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form