शिवतीर्थ (शिवाजी पार्क) मैदानावरच दसरा मेळावा --अखेर सत्याचा विजय ठाकरे

हायकोर्टाने दसरा  मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटालाच देण्याचा निर्णय दिला


पंढरपूर ---(विनोद पोतदार)
शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मागितलेली परवानगी मुंबई महानगरपालिकेने नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर सुधारित याचिका करण्याची ठाकरे यांच्या शिवसेना गटाची मागणी उच्च न्यायालयाने मान्य केली आहे शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गट आग्रही आहे. याप्रकरणी शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. गेली 28 वर्षे ज्या मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता होती, त्याच पालिका प्रशासनाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे व शिंदे गटाला शिवाजी पार्क मैदान नाकारले होते. दसरा मेळाव्याला कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा अभिप्राय पोलिसांनी दिल्याचे कारण पुढे करत पालिकेच्या जी - उत्तर विभागाने दोन्ही गटांना तसे पत्र पाठवून कळवले होते.
सुधारित याचिका करण्याची ठाकरे यांच्या
शिवसेना गटाची मागणी उच्च न्यायालयाने
मान्य केली आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे गटाने स्थानिक आमदार सदा सरवणकर
यांच्या वतीने ठाकरे गटाच्या याचिकेला
विरोध करणारी मध्यस्थी याचिका केली.
यावर आज सुनावणी पार पडली.मुंबईतल्या शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्या घेण्यासाठी उच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. त्यामुळे शिंदे गटाला जोरदार धक्का बसला. मेळाव्यासाठी शिवसेनेकडून कायदा व्यवस्थेची हमी घेण्यात आली. सोबतच यावेळी कोर्टाने महापालिकेलाही फटकारले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form