पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील १४ ठिकाणी ४००० गणेश मूर्ती संकलित

नगरपालिका व पोलीस प्रशासन यांचे 
   चोखं नियोजन                                                                                                        

पंढरपूर(प्रतिनिधी)
पंढरपूर शहरातील घरगुतीसह सार्वजनिक ठिकाणच्या गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने शहरात विविध १४ ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्राची उभारणी करण्यात आली होती त्या कामी ५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते . तसेच गणेश विसर्जनाच्या वेळी निर्माल्य गोळा करण्यासाठी फिरत्या वाहनांची व प्रत्येक घाटावर वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती.
        
         तसेच उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने भीमा नदीमध्ये साठ ते सत्तर हजार क्यूसेक्सपाणी सोडण्यात आले होते त्यामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढून सर्व घाटाला पाणी लागले होते याबाबत जलसंपदा विभागाने सुद्धा सावधानतेचा इशारा दिलेला होता. पंढरपूर नगर परिषदेने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत चंद्रभागा नदीपात्रात बोटीची व जीवरक्षकांची व्यवस्था केली होती नागरिकांना गणेश विसर्जन करताना कोणताही धोका उद्भवू नये म्हणून नगर परिषदेच्यावतीने व पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रत्येक घाटावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती व बॅराकेटिंग करण्यात आले होते .गणेश विसर्जनच्या ठिकाणी पुरेसा प्रकाशव्यवस्था राहण्याच्या दृष्टीने प्रत्येक घाटावर व यमाई तलावाच्या ठिकाणी सुद्धा अत्यावश्यक ठिकाणी विज दिव्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच शहरातील प्रत्येक चौकात मोठ्या प्रमाणात प्रकाश व्यवस्था करण्यात आली होती. 
                 
  घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जनाच्या गणेश मूर्ती संकलित करण्यासाठी पंढरपूर अर्बन बँक प्रशासकीय इमारती समोर, भोसले चौक, गणेश मंदिरासमोर, शेटे पेट्रोल पंपा समोर, कॉलेज चौक बस स्टॉप जवळ, ठाकरे चौक, स्वा. वीर सावरकर चौक गजानन मेडिकल समोर, शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले पुतळ्यासमोर, महाद्वार चौक पोलीस चौकी जवळ, मुक्ताबाई मठा समोर, अंबाबाई पटांगण स, यमाई तलाव गेट जवळ, टाकळी रोड तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाजवळ या ठिकाणी गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले होते या गणेश मूर्ती संकलन केंद्रावर नागरिकाकडून सुमारे ४००० गणपती संकलित करून त्यांचे विसर्जन करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली संपूर्ण गणेश उत्सव काळ ते गणेश विसर्जन कालावधीपर्यंत उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक गजानन गुरव व मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, नगर अभियंता नेताजी पवार, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे ,आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर, विद्युत अभियंता राजकुमार सपाटे, रोडलाईट इन्स्पेक्टर संतोष क्षीरसागर, अग्निशमन अधिकारी बाळासाहेब कांबळे, चिदानंद सर्वगोड,दत्तात्रय व्होटकर सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी हे काम करीत होते.पंढरपूर नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या वतीने नदीपात्रात विसर्जन करताना कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि कडक अंमलबजावणी करण्यात येत होती,कोणालाही वाहत्या नदीपात्रात प्रवेश करू दिला जात नसल्याने अनुचित प्रकार अथवा दुर्घटना घडली नाही. तीन दिवस विसर्जन शांततेत पार पडले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form