पंढरपूर ----
तालुक्यातील कोर्टी येथे तलाठी कार्यालय येथे राज्यव्यापी आधार नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते.
या शिबिरामध्ये मतदान कार्ड याला आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येत आहे, आज रविवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी कोर्टी येथे राज्य व्यापी मतदार आधार जोडणी शिबिर आयोजन करण्यात आले होते तर कोर्टी येथील सर्व मतदार बंधू-भगिनी या शिबिरा मध्ये सहभागी घेऊन आपले मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करून घ्यावे असे आवाहन तलाठी भाऊसाहेब अझरुद्दीन पठाण यांना केले आहे या कामी प्राथमिक शाळेतील शिक्षक पाटील व दोडमे सर मंदाकिनी वाघमारे मॅडम ग्रामपंचायत सदस्य अनिश पाटील ,विजय माळी, मुसा काजी, ईनुस पाटील यांनी मोलाचे योगदान दिले तर ग्रांमस्थ मोठ्या संख्येने आधार कार्ड जोडणी शिबिरात सहभागी झाले होते.