पंढरपूरात नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी
पंढरपूर ---(विनोद पोतदार)
पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व देवी भक्त तसेच विविध नवदुर्गा नवरात्र उत्सव साजरा करणारे सार्वजनिक मडळांने आई अंबाबाईच्या स्वागतासाठी सज्ज आहेत अनेक मंडळांनी सुंदर, सुबक मंडप डेकोरेशन केले आहेत तर काहींनी विविध सार्वजनिक मडळांने विविध सार्वजनिक कार्यक्रम नियोजन केले आहे
या आनंदी व उत्साही वातावरणातच नवरात्र उत्सवाची सुरुवात उद्या
पहाटेपासून दुपारपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त असल्याने कोणत्याही वेळी नवदुर्गा, नवरात्र
घटस्थापना करून नवरात्रीतील पूजन करता येईल. यंदाच्या वर्षी घट स्थापनेपासून नवव्या दिवशी नवरात्रोत्थापना असून दसरा 10 व्या दिवशी आहे. अनेकदा, नवरात्रोत्थापन व दसरा एका दिवशी येतात, मात्र या वेळेस दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवरात्रोत्थापन आहे, तिथीच्या क्षयवृद्धीमुळे असा फरक असतो, असे पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी सांगितले.
विजया दशमी, दसरा, सीमोल्लंघन हे ५ ऑक्टोबर रोजी असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी 2.26 ते 3.31 या दरम्यान आहे