हर्ष उल्हासात गौराईचे स्वागत..... फुलांच्या रांगोळीला आले महत्त्व

हर्ष उल्हासात गौराईचे स्वागत
फुलांच्या रांगोळीला आले महत्त्व 

पंढरपूर --
गणरायाच्या पाठोपाठ येणाऱ्या गौरींना शनिवारी दिवसभर उत्साहात आवाहन करण्यात आले. भाजी-भाकरीचा नैवेद्य, औक्षण आणि एकत्र कुटुंबाची मांदियाळी अशा वातावरणात गौरींचे स्वागत करण्यात आले. महालक्ष्मींचे आगमन झाल्यापासून सामाजिक संदेश देणाऱ्या आरासाला महिलांनी सुरुवात केली. पानाफुलांच्या हिरवाईला आणि राशींच्या पारंपरिक आरासालाही महिलांची पसंती असल्याचे पाहायला मिळाले, रविवारी गौरी पूजन आहे. याकरिता महिलांनी सोळा भाज्या, गोड नैवेद्य यांची तयारी सुरू केली. त्यात येणाऱ्या - जाणाऱ्या पाहुण्यांची वर्दळही सुरू आहे. यंदाच्या गौरी उत्सवाचा वेगळाच उत्साह आहे. महिला मोठ्या हिरीरीने संपूर्ण उत्सव परिपूर्ण करण्यासाठी तल्लीन होऊन झटताना पाहायला मिळत आहेत.
फुलांच्या रांगोळीला आले महत्त्व
यंदाच्या वर्षी नवरंगी रांगोळीला फाटा देत
महिला फुलांच्या रांगोळीला अधिक महत्त्व देत आहेत. या रांगोळी मांडवात काढणे
आणि नंतर त्या पुन्हा आपल्या सोयीनुसार
सुकल्यानंतर बाजूला करणे सोपे होत आहे.
त्यामुळे महिला याला प्राधान्य देताना दिसत
आहेत.  गुलाबाच्या पाकळ्या, झेंडूची फुलं,
शेवंती, मोगऱ्याची फुलं,  
व अशोकाची पाने , आंब्याची पाने अशा विविध फुलापानी रांगोळी व सजावट होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form