पंढरपूर ----
(विनोद पोतदार)
प्रत्येक मनुष्य हा ग्राहक ग्राहकाने वस्तू खरेदी करताना सावधानता बाळगून आपण खरेदी केलेल्या वस्तूची पावती घेणे गरजेचे आहे त्यामुळे एखादी वस्तू खराब निघाल्यास बदलून घेण्यास अडचणी येणार नाही ग्राहक संरक्षण परिषद ही कोणत्याही व्यापाऱ्याच्या विरोधात नसून अनुचित प्रकार अनुचित व्यापार याच्या विरोधात आहे यासाठीच 24 डिसेंबर 1986 रोजी स्वर्गीय बिंदू माधव जोशी यांच्या अथक प्रयत्नाने स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी हा कायदा संमत केला आणि ग्राहकाला न्याय मिळू लागला याकरता ग्राहकाने वस्तू खरेदी करताना पावतीचा आग्रह केला पाहिजे असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे उपाध्यक्ष व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत सदस्य पत्रकार नंदकुमार देशपांडे यांनी केले यावेळी ग्राहक पंचायतीचे जेष्ठ सदस्य पी व्ही कुलकर्णी ही उपस्थित होते.
लक्ष्मी टाकळी परिसरातील नूतन ग्रामपंचायत सदस्य सागर भैय्या सोनवणे व पंचायत समिती अमृत महोत्सव बाल संजीवनी अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी टाकळी येथे आयोजित केले होते यावेळी अंगणवाडी श्रीराम नगर लक्ष्मी टाकळी येथील मुख्य सेविका शिंदे एन डी यांना जिल्हा परिषदेचा पृष्ठ मुख्य सेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच जीप अंगणवाडी मुख्य सेविका विजया देठे यानाही उत्कृष्ट सेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल अखिल भारतीय ग्राहक पंचायत व लक्ष्मी टाकळी प्रभाग क्रमांक चार चे सदस्य सागर भैय्या सोनवणे यांच्या वतीने वरील पुरस्कार प्राप्त मुख्य सेविकांचा पुष्पहार देऊन सागर भैय्या सोनवणे व नंदकुमार देशपांडे सदस्य मिलिंद देवल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात गादेगाव ,लक्ष्मण टाकळी येथील अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या या कार्यक्रमात पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री कुंभार , गादेगाव येथील बालकल्याण विकास अधिकारी मदने मॅडम उपस्थित होत्या, यावेळी विस्ताराधिकारी कुंभार यांनी सांगितले की ग्राहक पंचायत ही ग्राहकांसाठी सेवा देणारी असून आमच्या येथील पुढील कार्यक्रमात आम्ही नागरिकांच्या हितासाठी व महिला सक्षमीकरणासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत आमंत्रित करून ग्राहकांना व आमच्या सेविका म्हणून भगिनींना त्यांचा लाभ घडवला जाईल यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर भैय्या सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून त्यांनीही ग्राहक पंचायती सहकार्य करण्याचे मान्य केले आहे या कार्यक्रमास श्रीराम नगर परिसर व गादेगाव परिसरातील मुख्य सेविका बहिणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.