भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचचा उपक्रम
करकंब (प्रतिनिधी)
करकंब येथील आदर्श प्रशाला व ज्यु. कॉलेज करकंब येथे भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तर्फे पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.
येथील आदर्श प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तर्फे पाहिले राज्यस्तरीय कवी संमेलन घेण्यात आले. यावेळी माजी जि प सदस्य बाळासाहेब देशमुख, संस्थेचे अध्यक्ष रामदास शेटे, गटसचिव संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, मारुती देशमुख, विशाल सिरसट, विजय जायभाये, शिल्पा मुसळे, प्राचार्या विजया उंडे, केंद्रप्रमुख आप्पासाहेब माळी, आदींसह कवी व मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कवी लक्ष्मण जाधव यांनी याविषयी सुंदर स्वरात कविता सादर केली, डॉ सौदागर साळुंखे यांनी प्रेम कहाणी, देवाशीष ठाकरे (वाशीम) यांनी लगन ही कविता सादर केली, कवयित्री सुवर्णा पवार (इचलकरंजी) यांनी आठवण व वृषाली होगाडे (इचलकरंजी) यांनी नव कल्पना ही कविता सादर केली, प्रिया कौलवार यांनी गझल, वीणा व्होरा यांनी जीवनासाठी हवा पुस्तकांचा साज, वंदना पाटणे(महूद) यांनी इथं राबता राबता ही कविता सादर केली, कवी महादेव नागणे यांनी कवितेमधून प्रेमाची गाणी न गाता सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले.फ्रीडम स्टोरीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष संजय सांगोलकर यांनी आईविषयी आपल्या भावना व्यक्त केली. तर डॉ.सौदागर साळुंखे यांनी प्रेम चारोळीतुन प्रेमकहाणी सादर करून उपस्थित लोकांना प्रेमात पडल्यावर काय होतं हे खुसखुशीत शैलीत मांडले.
प्रास्ताविक व स्वागत प्रा नंदकुमार नाईकनवरे व राणी शिदवाडकर यांनी केले, सूत्रसंचालन डॉ प्राची बामणे व प्रा बापूराव खांडेकर यांनी केले तर आभार फ्रीडम स्टोरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय सांगोलकर यांनी मानले.