जुन्या अकलूज रोड वरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी----उपसरपंच रामदास नागटिळक ,कैठाळी

दुर्गा देवीच्या मंदिराजवळ असलेल्या पुलाची उंची कमी असल्यामुळे

पंढरपूर :----
पंढरपूर तालुक्यातील शिरढोन येथील दुर्गा देवीच्या ओढ्यावर पुराचे पाणी आल्यामुळे जुना -अकलूज रोड वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दुर्गा देवीच्या मंदिराजवळ असलेल्या पुलाची उंची कमी असल्यामुळे वारंवार चंद्रभागा नदीला येणाऱ्या पुरामुळे जुना अकलूज रोड वाहतुकीसाठी बंद राहत आहे. सध्या जुन्या आकलुज रोड वरून शेळवे, खेड भाळवणी ,शेळवे येथील कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज च्या विद्यार्थ्यांना याच मार्गावरून जावे लागत असल्यामुळे मोठ्याप्रमाणावर अडचण निर्माण होत आहे. या ओढ्यावर पुराचे पाणी आल्यावर पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे परिसरातील नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात घडले आहेत, तरी संबंधित अधिकाऱ्याने याकडे लक्ष देऊन जुना अकलूज रोड वरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी कौठाळी चे विद्यमान उपसरपंच रामदास नागटिळक यांनी संबंधित अधिकार्‍यांकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form