ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना दर दिलाच पाहिजे अन्यथा स्वाभिमानी स्टाईलने कारखान्याच्या मुजोर प्रशासनाला धडा शिकवू
.पंढरपूर ---(विनोद पोतदार)
सद्गुरु कारखान्यावर स्वाभिमानीचा राडा.... मागील वर्षीच्या गाळपंगांमध्ये सद्गुरु श्री श्री कारखान्याकडून 2660 रुपये प्रति टन उसाचा दर जाहीर करण्यात आला होता चांगला ऊस दर जाहीर केल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या कारखान्याकडे ऊस गाळपासाठी पाठवला परंतु कारखाना प्रशासन शेतकऱ्यांना प्रति टन 2437 रुपये दर देऊन तोंडाला पाणी पुसण्याचा प्रयत्न करत आहे.... उर्वरित 223 रुपये कधी मिळणार या प्रतीक्षेत शेतकरी आहेत परंतु कारखाना प्रशासन कोणत्याही प्रकारची भूमिका जाहीर केली नाही यापुढे दर मिळणार नाही असे सांगत आहेत त्यामुळे सद्गुरु श्री श्री कारखान्याकडून शेतकऱ्याची फसवणूक झाली आहे ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना दर दिलाच पाहिजे अन्यथा स्वाभिमानी स्टाईलने कारखान्याच्या मुजोर प्रशासनाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही
आज फक्त प्रतिनिधिक स्वरूपात काही निवडक कार्यकर्ते घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यावर प्रशासनाला इशारा दिला आहे जर ठरल्याप्रमाणे दर नाही दिला तर चालू गाळप हंगामात कारखान्याचे धुराडे भेटू देणार नाही पंढरपूर तालुक्यातील ऊस पाठवलेले सर्व सभासद घेऊन सद्गुरु कारखान्यावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील यांनी दिला यावेळी माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर सचिन आटकळे श्रीनिवास नागणे भैया पाटील नागणे सचिन नागणे शरद नागणे पांडुरंग नागणे दत्ता नागणे संतोष नागणे किरण जगदाळे प्रवीण नागणे किरण जगदाळे प्रवीण नागणे मगन काळे समाधान काळे इत्यादी उपस्थित होते