खंडाळीत बैलपोळा उत्साहात संपन्न


खंडाळी (वार्ताहर) (मंगेश सोनार)
[]
खंडाळी (ता.माळशिरस) येथे दर्श  पिठोरी अमावस्या म्हणजे श्रावणी पोळा उत्साहात पार पडला.स्व.सिताराम अण्णा पताळे-पाटील यांच्या वाड्यासमोर त्यांचे सुपुत्र उत्तमराव पताळे-पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सुनिता उत्तमराव पताळे-पाटील यांच्या हस्ते सायंकाळी बैलांची विधीवत पुजा करण्यात आली.पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालण्यात आला.
[] त्या आधी सकाळी बैलांना स्वच्छ धुवून दुपारपासून बैलांना सजवण्यात आले.शिंगाना रंगवून त्यावर रंगबेरंगी बेगड चिटकवण्यात आले.बैलाच्या अंगावर खास पंढरपूरहून आणलेल्या झुली टाकण्यात आल्या.गळ्यात नव्या घुंगरूच्या माळ घालण्यात आल्या.विधीवत पुजेनंतर बैलांची सवाद्य गावातील प्रमुख मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूक नंतर सर्वांनी भोजनाचा अस्वद घेतला.यावेळी सुरज पताळे, समाधान पताळे,भानुदास पताळे,शब्बीर शेख,पांडुरंग पताळे,लक्ष्मण पताळे,नानासाहेब चंदनकर, विठ्ठल पवार, व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form