भाळवणीत बैलपोळा सण साजरा


पंढरपूर -----(प्रशांत माळवदे)
-तालुक्यातील भाळवणी व परिसरातील  शेतकऱ्यांनी बैलपोळा सण मोठ्या उत्साही वातावरणात साजरी केला.
गेली दोन वर्ष कोरोणाचा कालावधी असल्यामुळे बैलांची मिरवणूक करता आली नाही त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर हा सण साजरा करता आला नाही
पण यावर्षी कोरोना कमी झाल्यामुळे हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच बैलांची मिरवणूक मोठ्या उत्साही वातावरणात पारंपारिक वाद्य वाजवत मुख्य बाजारपेठेतून काढण्यात आली होती. यावेळी शेतकरी महिला ग्रामस्थ या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.
यावेळी शेतकरी चव्हाण म्हणाले  की आमच्या शेतीसाठी बैल मोठ्या प्रमाणात मदत करत असतात.त्यांना वर्षातून एकदाच हा सण येत असल्यामुळे आम्ही बैलाचे सर्व साहित्य नवीन खरेदी करून मोठी वाजत गाजत मिरवणूक करतो. यामुळे आम्हाला आनंद निर्माण होतो.
यावेळी दुकानदार गांधी म्हणाले मागील दोन वर्षापेक्षा यावर्षी बैलपोळा सण चांगला साजरी झाला .शेतकऱ्यांनी बैलाचे सर्व साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी केले. त्यामुळे हा सण चांगल्या प्रमाणात साजरी करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form