साखर कारखानदार, डॉक्टर्स,हॉस्पिटल, उद्योजक रडारवर
सोलापूर / पंढरपूर - (विनोद पोतदार) सोलापूरातील सहकार क्षेत्रातील हॉस्पिटल न त्याच्याशी संबंधीत प्रमुख पदाधिकारी आणि तेथेच सेवेत असलेल्या प्रसिध्द हृदयरोग 1. तज्ञांच्या घर, कार्यालय आणि खाजगी हॉस्पिटलवर आज सकाळी आयकर खात्याची 1. टिम पोहचली आहे. याच बरोबर पंढरपूरात विठ्ठल साखर कारखान्याशी संबंधीत एक प्रमुख पदाधिकारी आणि त्यांच्या उद्योग समुहावरही धाड पडल्याचं वृत्त आहे..
याबाबतची कारवाई अत्यंत गुप्तता पाळून आज सकाळपासूनच सुरु झाली आहे. सर्व संबंधीत ठिकाणी पोलीस बंदोबस्तासह आयकर विभागाच्या टीम पोहचल्या आहेत. अधिकृतपणे
कोणतीही माहिती प्रसार माध्यमांना आयकर विभागाकडून मिळालेली नाही. सोलापूरात नावाजलेले हृदयरोगतज्ञ यांची सहकारी रुग्णालयात सेवा आहेच याचबरोबर त्यांची खाजगी हॉस्पिटलही आहेत.
तर पंढरपूरातील वाळू ठेकेदार ते साखर कारखानदार असा प्रवास करणाऱ्या तसेच विठ्ठल साखर कारखान्याशी संबंधीत असलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यावर धाड पडली आहे. त्यांच्या उस्मानाबाद येथील
आहे. त्यांच्या उस्मानाबाद येथील कार्यालयातही आयकर खात्याची टीम पोहचल्याचं वृत्त आहे. पंढरपूरात अलिकडच्या काळात एका राजकीय प्रस्थ म्हणून उदयास येत असलेल्या या नेत्यावर पडलेल्या धाडीनं राजकीय क्षेत्रात हा चर्चेचा विषय झाला आहे. तर सोलापूरात हृदय रोगाशी संबंधीत डॉक्टरांवर धाड पडल्यानं वैद्यकीय क्षेत्रातील इतर तज्ञांचेही छातीचे ठोके वाढले आहेत.