पंढरपूर तालुक्यात खळबळ ५३ गावांत नाही पिण्यायोग्य पाणी


भूजल विभागाच्या सर्वेक्षणात माहिती उघड




पंढरपूर (विनोद पोतदार): स्वातंत्र्यप्राप्तीपासून साठ वर्षांचा काळ लोटूनसुद्धा, नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. ही अखंड देशाची शोकांतिका आहे. भूजल विभागाकडून पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यात आली असून, पंढरपूर तालुक्यातील ५३ गावांत पिण्यायोग्य पाणी मिळत नसल्याचे उघड झाले आहे. भूजल विभागाच्या तपासणीतून ही गोष्ट समोर आली आहे. यामुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील २४२ गावातील नागरिकांसाठी पिण्यायोग्य पाणी उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. भूजल विभागाने जिल्ह्यातून ९६८३ नमुने तपासणीसाठी घेतले

होते. यातील ९०८ नमुने चिंतादायक आढळून आले आहेत. या पाण्यात लोह, पीएच, क्लोराईड, सल्फेट आणि हार्डनेस हे आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात असल्याचे आढळून आले आहे. हेच पाणी गावागावातील नागरिक पिण्यासाठी वापरत असल्याचे उघड झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली गोपाळपूर, गुरसाळे, होळे, जाधववाडी, करकंब, कौठाळी, खेडभाळवणी, खेडभोसे सुगाव खुर्द, पिराची कुरोली, पोहरगाव, पुळुज, पुळुजवाडी, रांजणी, शंकरगाव, शेळवे, शिरढोण, अनवली, आवे, बाभूळगाव, बार्डी, भंडीशेगाव, भटुंबरे, बोहाळी, चळे, चिलाईवाडी, देगाव, देवडे, चिंचोली भोसे, उजनी वसाहत,

पंढरपूर तालुक्यात आजवर पिण्याच्या पाण्यासाठी गावोगाव अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा विभागातून माहिती घेतल्यास याबाबतचे चित्र स्पष्ट होते. पंढरपूर तालुक्यातील १०३ गावांपैकी ५३ गावांत नागरिकांना पिण्यायोग्य पाणी मिळत नाही, असा अहवाल भूजल विभागाने नुकताच दिला आहे. या माहितीमुळे दररोज आपण अशुद्ध पाणी पिऊन, आरोग्याची खेळत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

उपरी, विटे, वाखरी, बिटरगाव, सुस्ते, टाकळी, गुरसाळे टाकळी, तारापूर, तावशी, तुंगत, मगरवाडी, मुंढेवाडी, नेमतवाडी, ओझेवाडी, पटवर्धन कुरोली, पेहे, सिद्धेवाडी, एकलासपूर, कोंढारकी, कोर्टी या गावांचा यात समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form