मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला समुपदेशन केंद्राकडून १ जानेवारी ते १५ ऑगस्ट या दरम्यान दाखल झालेल्या २०५ प्रकरणात पती-पत्नीमध्ये समझोता करण्यात यश आल्याने विस्कळीत झालेले संसार पुन्हा नव्या जोमाने उभारले आहे का चमत्कारत.दरम्यान, , महिला समुपदेशन केंद्राने चार विधवा पुर्नविवाह लावून पती-पत्नीला समाजात जगण्याचे मानाचे स्थानही मिळवून दिले आहे.मंगळवेढा पोलीस ठाण्यात महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने महिला समुपदेशन केंद्र चालवले जाते
या केंद्रात १ जानेवारी ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत एकूण २०५ प्रकरणे दाखल करण्यात आली होती. ही सर्व प्रकरणे समझोता करून मोडकळीस आलेले संसार पुन्हा नव्याने उभे करण्यात या केंद्रातील समुपदेशक विभावरी कसबे व वैशाली गायकवाड यांना यश आले आहे.