पंढरपूर---
येथील हिंदू महासभा यांच्या वतीने कै प्रकाशदादा उत्पात यांना प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजली.पंढरपूर(प्रतिनिधी)पंढरपूर येथील हिंदू महासभेच्या वतीने ज्येष्ठ हिंदुत्ववादी, प्रखर सावरकरवादी, स्व. प्रकाश पांडुरंग उत्पात यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शुक्रवार दि१९ऑगस्ट रोजी सायंकाळी हिंदू महासभा कार्यालयात श्रद्धांजली सभा घेण्यात आली, यावेळी बोलताना ह भ प रामकृष्ण महाराज वीर म्हणाले,प्रकाशदादा उत्पात हे एक ध्येयवादी, खरे हिंदुत्ववादी होते,हिंदुत्वासाठी त्यांनी आपल्या संसाराचा,नोकरीचा विचार केला नाही.सच्चेपणा, दिलदार वृत्ती,परखड आणि निर्भय भूमिका यामुळे दादा संपुर्ण पंढरपूर शहरात लोकप्रिय होते, धाडसी ,निडर स्वभावामुळे दादा परिचित होते,यामुळे उत्पात गल्ली परिसरात सर्वाना सुरक्षा वाटत असे, दादा जेवढे जहाल क्रांतिकारी विचारांचे होते तेवढेच धार्मिक वृत्तीचे होते, खरे,आणि स्पष्ट बोलण्याचा स्वभाव त्यांच्या मनाच्या निर्मळतेमुळे होता. असे वीर महाराज म्हणाले,यावेळी ह भ प महेशाचार्य महाराज उत्पात,ज्येष्ठ हिंदू महासभा नेते विवेक बेणारे,अभय इचगावकर,कुलकर्णी,क्रांतिसिंह उत्पात, पेशवा युवा मंचचे श्री गणेश लंके, इनामदार,यांनी मनोगत व्यक्त केले,यातून प्रकाशदादा उत्पात यांनी पंढरपूर येथे तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांच्या विरोधात केलेले आंदोलन, जीवावर उदार होऊन अयोध्या श्री राममुक्ती आंदोलनातील पराक्रम,अनेक प्रलोभने, पद,पैसा यांचा त्याग करून हिंदू महासभेसाठी दाखविलेली निष्ठा, अशा विविध पैलूंवर मनोगत व्यक्त करण्यात आले, यावेळी स्व, प्रकाशदादा यांचे ज्येष्ठ सुपुत्र ,पांडुरंग ऑटोमोटीव्ह चे संचालक राहुल प्रकाश उत्पात, सौ राधिका उत्पात,अपूर्वा उत्पात,दि पंढरपूर अर्बन बँकेचे निवृत्त शाखाधिकारी श्री आनंद उत्पात, पत्रकार विरेंद्रसिंह उत्पात, चैतन्य उत्पात,सावरकर वाचनालय कर्मचारी ,उत्पात गल्ली,पश्चिमद्वार, रुक्मिणी पटांगण परिसरातील व्यापारी ,हिंदू महासभा अध्यक्ष श्री बाळासाहेब डिंगरे,श्री भोले आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
विनोद पोतदार