नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी फिकट गुलाबी रंगाची मतपत्रिका

पंढरपूर नगरपरिषद निवडणूक : मतदानासाठी प्रशासन सज्ज 
     * ईव्हीएम मतदान यंत्र सील ;अतिरिक्त ३६  राखीव मशीन 
पंढरपूर दि:-(29)- 
पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता 2 डिसेंबरला मतदान व 3 डिसेंबर मतमोजणी होणार आहे. पंढरपूर नगर परिषदेमध्ये एकूण 18 प्रभागात 95 हजार 559 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी  ईव्हीएम मतदान यंत्र सील करण्याची प्रक्रिया शुक्रवारी पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पार पडली  असून, प्रशासनाने शांत, पारदर्शक व सुरळीत निवडणुकीसाठी आवश्यक ती  सर्व यंत्रणा सज्ज केल्या असल्याचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.

पंढरपूर नगरपालिका निवडणूकसाठी  एकूण ९७ मतदान केंद्रासाठी यंत्रे सज्ज करण्यात आले असून, प्रभाग क्रमांक ०१, ०२, ०३, ०६, ०७.०८, १०, ११ ,१२,१५, १६, १७,१८   या प्रभागासाठी दोन  मशीन असतील तर प्रभाग क्रमांक ०४,०५,०९,१३,१४ या प्रभागात उमेदवारांची संख्या कमी असल्याने एकच मशीन राहणार आहे.  तसेच प्रत्येक प्रभागासाठी दोन  राखीव यंत्रांची तरतूद करण्यात आली असून, अतिरिक्त ३६  राखीव मशीन उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. ईव्हीएम मतदान यंत्र सील करण्याची प्रक्रिया शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉक्टर सीमा होळकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली, मतदान प्रक्रियेतील अचूकता तपासण्यासाठी एक हजार मतदानाची अधिरुप चाचणी घेण्यात आली  आहे.

             नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी फिकट गुलाबी रंगाची मतपत्रिका असणार आहे. पांढऱ्या रंगाची मतपत्रिका प्रभाग (अ) नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी असेल तर फिकट निळ्या रंगाचे मतपत्रिका प्रभाग (ब) नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी असेल प्रत्येक मतदाराने एक नगराध्यक्ष आणि दोन नगरसेवक याप्रमाणे एकूण तीन मते द्यायचे आहेत .तीन मते दिल्याशिवाय मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही.

तसेच दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे तीन डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारण्यात आली असून नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आले आहेत. शांततापूर्ण, पारदर्शक आणि यशस्वी निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असल्याचेही सहा. निवडणूक निर्णय अधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.

00000000

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form