स्वराज्य पोलीस पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने शहरातील विविध समस्या विषयी पंढरपूर नगरपालिकेस निवेदन

तातडीने दखल घेत संबंध विभागास दिले आदेश....
पंढरपूर प्रतिनिधी-- 
पंढरपूर शहरातील विविध समस्यांबाबत तसेच निकृष्ट दर्जाचे काम आदी विषयांवर निवेदन उपमुख्यधिकारी सूर्यवंशी यांना स्वराज्य पोलिस पत्रकार मित्र संरक्षण व माहिती अधिकार संघटना पंढरपूर यांच्या उपस्थित पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आले.
  
सदर निवेदनाद्वारे पंढरपूर शहरात विविध ठिकाणी पावसामुळे पडलेले खड्डे भरून घेण्यात यावेत, तसेच ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे ते पुन्हा करण्यात यावे, तसेच बऱ्याच ठिकाणी चेंबरची उंची कमी असल्याने पाणी साठते. सदरचे चेंबर उचलून व्यवस्थित करून देण्याबाबत, तसेच तुंबलेले चेंबर आहेत ते चेंबर लवकरात लवकर मोकळे करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.याची त्यांनी तातडीने दखल घेऊन संबंधित  इंजिनिअरला बोलवून कोण कॉन्टॅक्टर आहे त्याच्यांशी संपर्क करून ती कामे व्यवस्थित रित्या पार पाडा असे सूचना करण्यात आल्या. सदर नगरपालिकेचे इंजिनियर  यांनीही सदरचे पंढरपूर मधील सर्व खड्डे पंधरा दिवसात व्यवस्थित करून घेतो. असे आश्वासन दिले.तसेच सदर  कॉन्ट्रॅक्टरला बोलवून तशा सूचनाही देण्यात आल्या. 
        
सदरचे निवेदन देताना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीराम बडवे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास कारंडे, पंढरपूर तालुकाध्यक्ष  प्रवीण सुरवसे, पंढरपूर शहराध्यक्ष  रवी सोनार, नागेश राहिरकर,  प्रकाश आलदर, कल्याण कांबळे, सुनील कारंडे, शंकर कवडे,  दत्तात्रय कमले, गंगाधर स्वामी हे आदी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form