पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यानिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांत प्रत्यक्ष पाहणी करताना दिसुन आले.
चळे, आंबे,सरकोली,अनवली, बोहाळी, आदी भागात मातीचे बांध, रस्ते वाहून गेले आहेत.तर खरीप पिके, फळबागांमध्ये पाणी साचले,मका,कांदा,तूर,सूर्यफूल, बाजरी,टोमॅटो,मिरची,कांदा,भुईमूग,उडीद,दोडका,द्राक्ष, डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे
तसेच गावांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.यावेळी अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
तर पुळूज-सरकोली बंधाऱ्यावरील संरक्षण कठडे वाहून गेले. त्याचीही पाहणी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली. या संकटाशी सामना करण्याचे बळ बळीराजाला देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन धीर देऊन परिस्थिती जाणून घेत नुकसानीची पाहणी केली.
याप्रसंगी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नितीन शिंदे, संपर्क अधिकारी मनोज एलगुलवार, मोहन भोसले, उपसरपंच भास्कर भोसले, ग्रामविकास अधिकारी शहाजी शेणवे, तलाठी सुवर्णा डांगे, अशोक भोसले, क्लार्क बाळू सराटे, आदी उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता