पंढरपूर प्रतिनिधी --
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि भाळवणी बचाव समितीच्या शिष्टमंडळाने कारखान्यावर जावून घेतली कार्यकारी संचालक व संचालक मंडळाची भेट तसेच कारखाना भाडेतत्वावर देवू नये अशी विनंती केली व सद्यस्थितीची माहिती मागितली त्यावेळी कार्यकारी संचालक घोगरे यांनी तोंडी बोलणे सुरू असल्याचे कबूल केले तर संचालक सुरेशबापू देठे यांनी याबाबत मिटिंग मध्ये कोणताही ठराव अद्याप झाला नसल्याचे सांगितले व चेअरमन यांचेशी चर्चा करून दोन दिवसात संचालक मिटींग घेऊन याबाबत खुलासा करू असे सांगितले.
यावेळी माजी संचालक दिपकदादा पवार,नामदेवनाना ताड,ज्ञानेश्वर खरडकर, दीपक गवळी, नंदकुमार बागल, विठ्ठल संचालक धनंजय काळे, प्रकाश देठे, बाबा काळे,धोंडीराम घोलप, विलास देठे, रामचंद्र ढोबळे, बंडू हजारे, रावसाहेब निकम, हनुमंत सोनवले सर उपस्थित होते
Tags
सामाजिक वार्ता