बी.ए.एलएल.बी.साठी दि.२१ ऑगस्ट पासून तर एलएल.बी. साठी दि.२४ ऑगस्ट पासून कॅप राऊंड-३ प्रक्रिया सुरू



स्वेरीमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा
पंढरपूर प्रतिनिधी --
 'बारावी उत्तीर्ण झालेल्या व लॉ प्रवेशासाठी सीईटी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पाच वर्ष कालावधी असलेल्या बी.ए.एलएल.बी. (विधी) प्रवेशाचा कॅप राऊंड ३ हा गुरुवार, दि.२१ ऑगस्ट २०२५ ते शनिवार, दि.२३ ऑगस्ट २०२५ पर्यंत तर पदवी नंतर तीन वर्ष कालावधी असलेल्या एलएल. बी. (लॉ) च्या कॅप राऊंड ३ साठी रविवार, दि.२४ ऑगस्ट २०२५ पासून ते बुधवार, दि.२७ ऑगस्ट २०२५ पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे.' अशी माहिती स्वेरीचे संस्थापक डॉ. बी.पी. रोंगे व ‘स्वेरी लॉ कॉलेज’चे प्राचार्य डॉ. यु. एम. राव यांनी दिली.
   
स्वेरीमध्ये  डिप्लोमा, फार्मसी, एम.बी.ए., एम.सी.ए., पीएच.डी. हे अभ्यासक्रमा सोबत आता विधी (एल.एल.बी.) शिक्षण सुरू करण्याचे ठरविले. स्वेरीतील विधी शिक्षणाचे यंदाचे हे पहिलेच वर्ष असून त्याला शासनाकडून आणि बार कौन्सिल ऑफ इंडियाची देखील मान्यता मिळाली आहे. त्यामुळे स्वेरी कॅम्पस मध्ये असलेल्या नव्या इमारतीत हे शिक्षण यंदापासून सुरु झाले आहे. त्यासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया देखील झाली आहे. शिक्षणासाठी पोषक असलेल्या वातावरणात विधी शिक्षण सुरु झाले असल्यामुळे पंढरपूर पंचक्रोशीत भावी वकिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने एल.एल.बी. (तीन वर्ष व पाच वर्षे) प्रवेश प्रक्रिया पूर्वीच सुरु झाली असून ज्यांनी तीन वर्ष कालावधी असलेल्या एलएल. बी. (विधी) च्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा दिली आहे परंतु काही अडचणींमुळे रजिस्ट्रेशन करण्याचे राहून गेले आहे अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष नुकसान होऊ नये यासाठी रजिस्ट्रेशन करणे, ए फॉर्म भरणे यासाठी रविवार, दि.०३ ऑगस्ट २०२५ ते गुरुवार, दि.२७ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत दिली आहे.  तसेच पाच वर्ष कालावधी असलेल्या एल. एल. बी. (विधी) च्या प्रवेशासाठी शुक्रवार, दि.०१ ऑगस्ट २०२५ ते शनिवार, दि.२३ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत दिली आहे.  दिलेल्या अवधीत विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करून ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. कॅप राउंड नंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना विधी शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे त्या इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली  असणे आवश्यक आहे. तसेच ‘एमएएच- एलएलबी सीईटी २०२५' ही परीक्षा दिलेली असावी. असे पात्र विद्यार्थी एल.एल.बी. मध्ये प्रवेश घेऊ शकतात. स्वेरीचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली, प्राचार्य  डॉ. यु. एम. राव यांच्या नेतृत्वाखाली व तज्ञ प्राध्यापक वर्गाच्या सहकार्याने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची मोफत सुविधा स्वेरीमध्ये उपलब्ध केली आहे. एल.एल.बी. (३ वर्षे) व बी.ए.एलएल.बी. (५ वर्षे) च्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहीतीसाठी प्रवेश प्रक्रिया विभागाचे अधिष्ठाता डॉ.करण पाटील , समाधान मोरे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form