सांगोला प्रतिनिधी --
श्री.गणेश उत्सव आगमन व श्री समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त शुक्रवार दिनांक २९/०८/२०२५ रोजी सकाळी १० वाजता श्री.दत्त मंदिर महादेवगल्ली, सांगोला येथे श्री व सौ.आशा सोमेश यावलकर यांच्या शुभहस्ते व परीक्षक, श्री.अतुल ताडेसर, श्री.प्रसाद सोनटक्के परीक्षक (कोल्हापूर), श्री.अतुल उकळेसर,श्री. दयानंद बनकरसर,श्री.रामदास रोंगे गुरुजी,श्री.प्रसाद पाटील सुधाकर कुंभार, श्री. गेजगेसर श्री.दत्त मंदिर व्यवस्थापक श्री. नंदकुमार लहुळकर यांच्या उपस्थितीत तबलावादन स्पर्धेचे उद्घाटन झाले. या तालुकास्तरीय स्पर्धेसाठी जवळपास ५४ स्पर्धकांची नाव नोंदणी झाली होती ही स्पर्धा सकाळी १० वाजलेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू होती या स्पर्धेसाठी सांगोला तालुक्याचे माजी आमदार श्री शहाजी बापू पाटील यांनी भेट देऊन उपस्थित विद्यार्थ्यांचे कौतुक व मार्गदर्शन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या या स्पर्धा दिवसभर उत्साही वातावरणात संपन्न झाल्या या या स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री गणेश भंडारे यांनी केले या भजन स्पर्धेचे आयोजन श्री. संत गजानन भक्त परिवाराचे मार्गदर्शक,आधारस्तंभ मा.नगरसेवक डॉ.सोमेश्वर यावलकर यांनी केले अशी माहिती श्री.संत गजानन भक्त परिवाराचे श्री.अतुल उकळे यांनी दिली.
Tags
सामाजिक वार्ता