*वारीच्या वाटेवरून/येळकोट येळकोट जय मल्हार*

*संत ते देव,देव ते संत आज जेजुरी भेट* *महाराष्ट्रातील संत परंपरा.....* *भारतीय समाजात संतांचे एक वेगळे स्थान आहे, संत आपल्या भक्तीने ज्ञानाने, आत्मज्ञानाने, जगाच्या कल्याणाचा विचार करतात* जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात......... *न लगे मुक्ती धनसंपदा* *संत संग देई सदा* संतांचा महिमा कसा आहे, हे संत आपल्या उपदेशातून आपल्याला काय शिकवतात, तेही महत्त्वाचे आहे, सगळे संत आपल्याला उच्च, नीतिमत्तेचे आदर्श आपल्यापुढे ठेवतात, ह्या जगातल्या आपल्या अस्तित्वाला अर्थ देऊन परमार्थ साधावयाचा असेल तर चिंतन व नामस्मरण यांच्या योग्य ईश्वराच्या सानिध्यात राहिले पाहिजे, हे संतांनी आपल्या जीवनातून जाणून दिले आहे, संतांनी समतेची शिकवण दिली, कर्मकांडे नाकारले, संत कसा असला पाहिजे ? याबद्दल संत तुकाराम महाराज म्हणतात ते आपण पाहिले आहे, दुःखी पीडित, यांना जो आपले मानतो, तोच साधू होय, आणि अशा *माणसाच्या ठायी देव असतो, माणसाने माणसाला, माणूस म्हणून वागवावे,* आपल्या संततीला जे प्रेम दिले जाते, त्याच प्रकारचे प्रेम घरातील नोकर चाकरांनाही दिले पाहिजे, भेदाभेदाची कल्पना अमंगल आहे अशा आशयाचे अभंग त्यांनी लिहिले आहेत. आपण भगवंताला जाणून घ्यायचा प्रयत्न करतच आहोत, मार्गावर आपल्याला संत सतत मार्गदर्शन करतात, आपण कोण आहोत ?आणि आपले नेमके काय कर्तव्य आहे ? ते आपण पूर्ण करत आहोत का ? हे सर्व संतांच्या शिकवणीतून आपण समजून घेत असतो. अध्यात्माच्या वाटचालीत आपण जितके शुद्ध होत जाऊ, तितकी आपली प्रगती होत जाईल, सदर विचारांनी शुद्ध आचरण, आणि म्हणजेच सदविचार म्हणजे दुसऱ्याबद्दल दया, क्षमा, अंगी बाळगणे याप्रमाणे विचार शुद्ध झाले की आचार शुद्ध होतात, राहणे वागणे समाजातील व्यवहार चांगले झाले पाहिजेत, कोणाही बद्दल दुष्टता किंवा वाईट विचार येता कामा नयेत, आदर्श व्यवहार असावेत लोकांनी वाईट म्हणेल असा कोणताच व्यवहार होता कामा नये, दुसऱ्याला कोणत्याही प्रकारचे दुःख होईल असे आपण वागता कामा नये, त्याप्रमाणे राग, लोभ, इत्यादी दुर्गुणांपासून लांब राहिले पाहिजे, म्हणजे उत्तरो त्तर शुद्ध होत जातो. *संतांच्या मनात जनसामान्याविषयी अत्यंत कळवळा असतो*, त्यांना कितीही कष्ट पडले तरी ते आपल्या वर्तन नक्कीच बदल करत नाहीत, उदाहरणार्थ- संत ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना जन्मभर समाज छळत राहीला, विसोबा खेचर यांनी त्यांना खूप त्रास दिला, पण ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला त्यात कुठेही आपल्यावर झालेला त्रासाचा उल्लेख नाही, उलट विसोबा खेचरांना उपदेश करून शिष्यत्व दिले, व त्यांना गुरुपद लाभले, याचे कारण या सर्व संतांना सामान्यतः सामान्य माणसाला ज्ञान द्यायचे असते, ते त्यांनी देताना कुठलाच भेदभाव मानत नाहीत, आणि हेच संतांची खरी खूण आहे, या बहुसागरात गटांगळ्या खाणाऱ्या सामान्य माणसाला कर्माच्या असक्ती पासून दूर करून, निष्काम कर्मयोगाचा मार्ग संत दाखवतात. श्रीकृष्णाच्या मधुर भक्तीत रममाण असलेल्या मीराबाईने विषाचा प्याला सहज पचवला, ते कशाच्या जोरावर तर निष्काम भक्तीच्या जोरावर, संत ज्ञानेश्वरांची भावंडे असलेली संत सोपान देव, आणि मुक्ताबाई, आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवून लोक कल्याणासाठी आपल्या स्वतंत्र प्रतिभेचे दर्शन घडतात, संत निवृत्तीनाथ ज्ञानदेवांचे गुरु, पण कोणताही अहंकार व्यक्त न करता शांतपणे आपल्या शिष्याला संत ज्ञानदेवांना पूरक असे ज्ञान देत राहिले, तुलसीदासांसारख्या रामायणाचे महाकाव्यरचना करणाऱ्या कवीला भावणारा राम रामदासांना आदर्श राम वाटतो, आणि त्याचे गुणगान गातात. संत परंपरेचे वैशिष्ट्य असे की या संत परिवारात सर्व जाती धर्मातील संत आहेत, ते सर्व संत समाजाच्या कल्याणाचा विचार करीत होते, संत नरहरी सोनार कट्टर शिवभक्त, पंढरपुरात राहूनही भगवान पांडुरंगाचे तोंडही न पाहणारे, असे शिवभक्त होते, भगवान शंकरावर त्यांची एकनिष्ठ भक्ती होती, भगवान पांडुरंगाने त्यांची परीक्षा घेऊन त्यांच्या मनातील हरी आणि हर हा भेद नष्ट केला, आणि विठ्ठल भक्तीत रममाण झाले, देवांचे अवतार असतात, त्याप्रमाणे संतांचेही अवतार असतात, परंतु देव व संत यांच्या अवतारात फरक आहे, दोघांनाही एकच कार्य करावयाचे असते, व ते म्हणजे जगतात आनंदाचा प्रसार करणे हे होय, परंतु दोघांच्या कार्य करण्याच्या पद्धतीत मात्र फरक असतो, देवाला दृष्टांचा संहार करावा लागतो, परंतु संतांनी दृष्ट्यांना मारल्याचे एकही उदाहरण आढळून येणार नाही, ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत हे तर प्रत्यक्षात भगवंताचे अवतार होत, *लोपले ज्ञान जगी,हित नेणती कोणी* *अवतार पांडुरंग, नाव ठेवीयले ज्ञानी* या अवतारात माउलींनी दृष्टांना मारले नाही, जिथे देवाची शक्ती कमी पडत असते तेथे संतांची शक्ती प्रभावी ठरते, यात देवाला कमीपणा आहे असे मात्र नाही, संत हे कशाचीही अपेक्षा न करता आपल्याजवळ येणाऱ्यांचे कल्याण करतात, *दधिची ऋषींनी काहीही मोबदला न घेता इंद्राला वज्र करण्या करिता स्वतःची हाडे दिली*, संतांना माऊली म्हणण्यात आणखीही एक उद्देश आहे माऊलींच्या अंतकरणात आपला मुलगा चांगला असो, वा वाईट असो पण त्याचे निरंतर कल्याण व्हावे अशी तळमळ मातेची असते, मुलाने कितीही त्रास दिला तरी तिचे प्रेम कमी होत नाही, याप्रमाणेच *संतांना समाजाने दुर्जनांनी कितीही त्रास दिला तरी त्यासंबंधी त्यांची एकच प्रतिक्रिया असते, त्यांचे कल्याण व्हावे ही त्यांची अपेक्षा म्हणून संतांना माऊली या नावाने संबोधतात.* *आज माऊलीचा मुक्काम महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत जेजुरी,* ✒️ *श्री. रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी. ता. फलटण. जि. सातारा. फो‌.९९७०७४९१७७*

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form