रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे जीवनाचे सोने झाले :प्रा. महादेव जेधे

पंढरपूर प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये सीएचबी, पार्ट टाइम, लम्सम, रजा मुदत, पूर्णवेळ इ.प्रकारची नोकरी केल्यामुळे आणि विविध शाखांमध्ये काम केल्यामुळे अनुभव संपन्न जीवन जगता आले. संस्थेची, समाजाची व पर्यायाने देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी उत्कृष्ट काम करून मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माझ्याही जीवनाचे सोने झाले असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक महादेव जेधे यांनी केले.प्रा. महादेव जेधे हे आपल्या तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त महाविद्यालयामध्ये स्टाफ वेल्फेअर समितीच्या वतीने दि. 28 एप्रिल 2026 रोजी सेवापूर्ती सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळच्या सत्काराला उत्तर देताना प्रा. महादेव जेधे बोलत होते. त्याचवेळी महाविद्यालयाचे कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, ज्युनिअर विभागातील अर्थशास्त्राचे प्रा. राजेंद्र पाटील, एच एस व्ही सी विभागातील वरिष्ठ लेखनिक श्रीमती कमलताई शिंदे, प्रयोगशाळा परिचर श्री परमेश्वर बनसोडे व भीमराव मेटकरी इत्यादी रयत सेवक सेवानिवृत्त झाले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तसेच रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव प्रा. डॉ जे.जी.जाधव तसेच महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव डॉ. के एच. शिंदे हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. बी. टी.जाधव हे होते. त्याचबरोबर डीवायएसपी(लोहमार्ग)श्री मनोजकुमार यादव व सोलापूर शहर पोलीस उपायुक्त श्री दिलीप पवार तसेच सत्कारमूर्तींचे नातेवाईक, विविध शाखांमधून आलेले रयत सेवक त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू-भगिनी सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. महाविद्यालयाच्या स्टाफ वेल्फेअर समितीचे चेअरमन डॉ.उमेश साळुंखे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.जी जी जाधव व डॉ. के एच.शिंदे यांनी सर्व रयत सेवकांच्या सेवापुर्ती निमित्त, आजवर केलेल्या कार्याचा गौरव केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी टी.जाधव यांनी सर्व सेवानिवृत्त सेवकांनी तंदुरुस्त राहून पुढील काळात सुद्धा संस्थेची व समाजाची सेवा करण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्टाफ वेल्फेअर समितीचे चेअरमन व सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form