पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर शहरात तसेच मध्यवर्ती भागातून सुरू असलेल्या
जड वाहतुकीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, यामुळे वारंवार
वाहतूक कोंडी तसेच अपघातांची शक्यता वाढली आहे.पादचारी तसेच महिला वर्ग,व्यापारी,
विद्यार्थी यांना रस्त्यावर मोठी समस्या निर्माण झाली आहे ही बाब लक्षात घेऊन
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना यांच्या वतीने
पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या वाहतूक शाखेला जड वाहतूक शहरातून बंद करून शहरा
बाहेरील मार्गाने वळविण्याबाबतचे निवेदन वाहतूक शाखा प्रमुख सोनवणे साहेब देण्यात
आले आहे. याप्रसंगी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार
संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष व विश्वस्त धनश्री उत्पात पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष
कैलास कारंडे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष उमेश ढोबळे तालुका अध्यक्ष प्रविण
सुरवसे, तालुका कार्याध्यक्ष शिवलिंग वसेकर, महिला तालुका उपाध्यक्षा सुवर्णा
कुरनावळ तालुका उपाध्यक्ष नागेश राहीरकर, अजित धतिंगे, दत्तात्रय कमले राम अभंगराव,
सुरज स्वामी, राहुल उजगारे, शुभम लिगाडे आदी उपस्थित होते.
