पंढरपूर प्रतिनिधी --
क्रेडाई पंढरपूर आयोजित गृह उत्सव २०२६ चे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच प्रफुल तावरे (अध्यक्ष क्रेडाई
महाराष्ट्र ) व आशिष पोखरणा (सचिव क्रेडाई महाराष्ट्र ) यांच्या हस्ते संपन्न होणार
आहे.तर गृह उत्साव 16 जानेवारी ते 18 जानेवारी या कालावधीत असणार असल्याची माहिती क्रेडाई
पंढरपूरचे अध्यक्ष आशिष शहा यांनी सांगितले आहे. यासाठी रेल्वे मैदान पंढरपूर येथे
भव्य शामियाना उभारण्यात आला आहे याठिकाणी बांधकाम व्यावसायिकसाठी विविध नामांकित
कंपनीचे विविध साहित्य व वस्तू विक्रीसाठी स्टॉल असणार आहेत. त्याच बरोबर सर्व
सामान्य माणसाचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी लागणारी माहिती व तसेच पुर्ण असणारे
गृह प्रकल्प, विविध साईट याबाबत माहिती दिली जाणार आहे. यासाठी नामवंत
उद्योजकांसाठी स्टाॅल उभारण्यात आले आहेत.तर विविध वित्तीय संस्था,तसेच खाद्य
पदार्थ तसेच इतरही अनेक महत्वपूर्ण स्टाॅल याठिकाणी असणार आहेत या आयोजित
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आ.समाधान आवताडे,माजी आ. प्रशांत परिचारक,आ.अभिजित
पाटील,नगराध्यक्षा डॉ प्रणिता भालके व युवक नेते प्रणव परिचारक यांची उपस्थिती
लाभणार आहे.तर क्रेडाई पंढरपूरचे अध्यक्ष आशिष शहा,उपाध्यक्ष शार्दूल नलबिलवार,सचिव
शशिकांत सुतार,खजिनदार महेश आराध्ये,सहसचिव शरदचंद्र कुलकर्णी,पीआरओ मिलिंद वाघ
यांच्यासह क्रेडाईचे सर्व सदस्य,युथ विंगचे सर्व पदाधिकारी,वुमेन्स विंगचे
पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहे.
