नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ.सुजाता जगताप यांच्या प्रचार शुभारंभ संपन्न
मंगळवेढा/ प्रतिनिधी
केंद्र व राज्य पातळीवर सत्तेमध्ये असणाऱ्या भारतीय जनता पार्टी व महायुती सरकारच्या माध्यमातून झालेल्या सर्वांगीण विकासाची प्रेरणा घेऊन आपल्या मंगळवेढा शहरात विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुप्रिया अजित जगताप व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांना होऊ घातलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले आहे. भारतीय जनता पार्टी व महायुतीचे नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते व पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेप्रसंगी उपस्थित जन समुदायाला संबोधित करत असताना ना.गोरे हे बोलत होते. सभेपूर्वी मंत्री ना.जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे तसेच सर्व उमेदवार व इतर पदाधिकारी यांनी श्री संत दामाजीपंत यांच्या पुतळ्यास तसेच शिवतीर्थ शिवप्रेमी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ही प्रचार सभेला येथील स्थानिक जनतेचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद म्हणजे येत्या ३ डिसेंबर रोजी होणाऱ्या महाविजयाची आणि भाजपा व महायुती सरकार बद्दल असणाऱ्या सकारात्मक विश्वासाची नांदी आहे. मंगळवेढा शहरातील सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीण आणि धोरणात्मक विकासासाठी भाजपा व महायुतीचे सर्व उमेदवार विकासाचे एक व्हिजन घेऊन आपणा सर्वांसमोर येत आहेत. त्यांच्याकडे असणारे व्हिजन हे केवळ निवडणुकीपुरते अथवा मतं मागण्यापुरते मर्यादित नसून उज्वल भविष्याच्या अनेक पिढ्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि उन्नतीसाठी हे सर्व उमेदवार मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आपली सेवा करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे त्यामुळे आपण कोणत्याही प्रलोभनास अथवा राजकीय अमिषाला बळी न पडता एक मुखाने आणि एक दिलाने भारतीय जनता पार्टी महायुतीचे नगराध्यक्ष त्याचबरोबर सर्व नगरसेवक उमेदवार यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार समाधान आवताडे हे म्हणाले की, ज्या पद्धतीने मागील चार वर्षांपासून मतदार संघामध्ये विकासाची मोठी पर्वणी निर्माण होत आहे अगदी त्याच पद्धतीने केंद्र व राज्य सरकार यांच्या माध्यमातून असणाऱ्या विविध योजनांच्या रूपाने भरीव आणि मोठ्या निधीची तरतूद करून आपण लोकप्रतिनिधी या नात्याने नगर परिषदेअंतर्गत विकासाची नवी गंगा या मंगळवेढा शहरांमध्ये प्रवाहित करू त्यासाठी आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे त्यांनीही आवाहनन यावेळी मतदारांना केले. यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण तसेच माजी उपनगराध्यक्ष अजित जगताप यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना तसेच महायुतीतील मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित