पंढरपूर येथे नगरपालिका निवडणुकीत भाजपा पक्षाच्या प्रचार फेरीस मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद..


पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपूर शहरात निवडणुकीचा रंग आता चांगलाच भरला असून प्रचारात खऱ्या अर्थाने रंग भरत आहे.
भाजप या सत्ताधारी सक्षम पक्षाकडून सौ श्यामल लक्ष्मण शिरसट या नगराध्यक्ष पदासाठी लढत असून त्यांच्या विरोधात डॉ प्रणिता भालके आहेत, मात्र सुरुवातीपासूनच शिस्तबद्ध प्रचाराने त्यांनी जनमानसात स्थान निर्माण केले आहे.

मंगळवार दि२५नोव्हेंबर रोजी सकाळी प्रदक्षिणा मार्ग, कालिकादेवी चौक, भाई भाई चौक, संत पेठ भागात भव्य रॅली काढण्यात आली यावेळी या भागातील स्थानिक लोकांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत लढणाऱ्या सौ श्यामल शिरसट यांचे स्वागत केले, ढोल ताशाच्या गजरात, हलग्यांच्या कडकडाटात जल्लोषात
स्वागत करण्यात येत होते,

भाजप पक्षाची देशात आणि राज्यात सत्ता आहे.
विविध विकासाची कामे सुरू असून भाजप आली तर पंढरपूर येथे विविध विकासकामे होणार असल्याने संत पेठ भागात नागरिकात उत्साह दिसून येत आहे.
यावेळी भाजप नेते माजी आमदार प्रशांत परिचारक, लक्ष्मण शिरसट,नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ श्यामल शिरसट, माजी नगरसेवक राजू सर्वगौड , इब्राहिम बोहरी या भागातील नेते, युवक, माता भगिनी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form