पंढरपूर शहरातील सर्व व्यापारी स्वच्छंदपणे व्यवसाय केला पाहिजे - डॉ प्रणिता भालके
पंढरपूर प्रतिनिधी -
पंढरपूर शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या प्रचारासाठी शहरातील विविध भागात कॉर्नर सभा उत्साहात होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पंढरपूर निवडणुक रणधुमाळीत एकमेकावर चांगलीच चिखलफेक होत असल्याचे दिसून येत आहे आज तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष उमेदवार डॉ.़ प्रणिता भालके यांनी पंढरपूर नगरपरिषद निवडणूक स्वच्छ पंढरपूर व भय मुक्त पंढरपूर करण्यासाठी तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक व नगराध्यक्ष म्हणून मी नागरिकां समोर विकासाचे व्हिजन घेऊन आली आहे स्वच्छ पंढरपूर,भय मुक्त पंढरपूर तसेच स्थानिक व्यापारी, मंदिर परिसरातील छोटे व्यापारी यांच्या वर सातत्याने होणारा अन्याय आपण पाहतोय पंढरपूर शहरातील सर्व व्यापारी स्वच्छंदपणे व्यवसाय केला पाहिजे यासाठी काम करणार स्थानिक व्यापारी यांना परप्रांतीय फेरीवाल्यांमुळे होणारा त्रास व त्यासाठी नगरपरिषद प्रशासन यंत्रणा कुचकामी ठरत आहे हे आपण अनुभवतोय.
पंढरपूर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असणारा कॅरोडर हा स्थानिक व्यापारी, पंढरपूर येथिल नागरिक यांचा हिताचा असावा, त्यांना विश्वासत घेऊन संबंधित प्रशासन विभागातील अधिकारी,कर्मचारी यांनी संवाद साधला पाहिजे पंढरपूर शहरातील विकास यासाठी कोणाचा विरोध नाही परंतु राजकीय स्वार्थापोटी नागरिकांच्या भावनेशी खेळ होताना दिसुन येत आहे अशा विविध विषयांवर तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्षापदाचे उमेदवार डॉ प्रणिता भालके यांनी व्यासपीठावर आपली भुमिका स्पष्ट केली.
यावेळी तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक उमेदवार तसेच नागरिक,व्यापारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते