*नगराध्यक्षा पदासाठी भाजपाकडून साधना भोसले, स्मिता अधटराव,वैशाली वाळुजकर आदी तर तिर्थक्षेञ विकास आघाडीकडून प्रिणिता भालके प्रमुख दावेदार*
--------
पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रभाग क्रमांक १५ मधुन नागरिकांचा मागास प्रवर्गमधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज आदित्य चंद्रकलेश्वर फत्तेपुरकर यांनी भरला आहे.
------
पंढरपूर प्रतिनिधी-- (विनोद पोतदार)
पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना वेग आला आहे. भाजपाकडून शहरातील टिळक स्मारक तर तिर्थक्षेञ विकास आघाडीकडून भगिरथ भालके यांच्या कोर्टाशेजारील बंगल्यावर मुलाखती पार पडल्या आहेत. दोन्ही गटांकडून नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुकांची गर्दी दिसून येत आहे. भाजपाकडून माजी नगराध्यक्षा साधना भोसले, वैशाली वाळुजकर, स्मिता अधटराव यांच्यासह इतर पाच महिलांनी नगराध्यक्ष पदासाठी मुलाखती दिल्या असून तिर्थक्षेञ विकास आघाडीकडून प्रिणिता भालके नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख दावेदार समजल्या जात आहेत. तर पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रभाग क्रमांक १५ मधुन नागरिकांचा मागास प्रवर्गमधून नगरसेवक पदासाठी आदित्य चंद्रकलेश्वर फत्तेपुरकर हा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे.
सोमवार दि १० पासून पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज भरणे सुरू झाले आहे सर्वच उमेदवारांकडून कागदपञांची जुळणी झाली असली तर पक्ष व नेत्यांच्या होकारानंतरच उमेदवार अर्ज भरणार आहेत.भाजपाकडून पंढरपूरातील निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पालकमंञी जयकुमार गोरे यांनी शहरातील टिळक स्मारक येथे नगराध्यक्ष पद व नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान आवताडे, जिल्हाध्यक्ष शशीकांत चव्हाण,प्रभारी प्रणव परिचारक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी ७ महिलांनी मुलाखती दिल्या आहेत तर नगरसेवक पदासाठी २३८ इच्छुाकांनी मुलखती दिल्या आहेत. येत्या तीन दिवसांत भाजपाकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहिर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आमदार अभिजीत पाटील,कल्याणराव काळे भगिरथ भालके,दिलीप धोञे,अनिल सावंत यांच्या पुढाकारातून तिर्थक्षेञ विकास आघाडी पंढरपूर नगरपरिषदेसाठी अस्तित्वात आली आहे. सुरूवातील माजी नगराध्यक्षा साधन भोसले यांना नगराध्यक्ष पदासाठी जागा मिळावी यासाठी नागेश भोसले हे प्रयत्नशिल होते. माञ ऐनवेळी प्रिणिता भालके यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी नाव पुढे आल्याने साधना भोसले यांनी पुन्हा भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी मागणी केली आहे. सध्या तिर्थक्षेञ विकास आघाडीकडून भगिरथ भालके,दिलीप धोञे हेच इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.आमदार अभिजीत पाटी,अनिल सावंत,कल्याणराव काळे यांची उपस्थिती दिसून आली नाही.
####
कमळ चिन्हावरच निवडणुक लढवली जाणार.
पंढरपूर पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये कमळ या भाजपाच्या चिन्हावरच सर्व मित्रपक्षासह निवडणूक लढवणार आहोत.पंढपूरातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे भाजपा पक्षालाचा देण्यात आले आहेत.
जयकुमार गोरे
पालकमंञी,सोलापूर
#####