वाखरी येथील माऊली कृषी प्रदर्शनाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पंढरपूर (प्रतिनिधी): 
वाखरी येथे कार्तिकी यात्रे निमित्ताने भव्य अशा कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील गायकवाड ज्ञानेश्वर फाउंडेशन आणि वाखरी ग्रामपंचायतच्या वतीने हे माऊली कृषी प्रदर्शन भरवण्यात आले असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन आज शनिवार दि. १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले आदी मंत्री महोदय उपस्थित राहणार आहेत.

यावेळी माजी आमदार तुकाराम काते, सदाभाऊ खोत, शहाजीबापू पाटील, प्रशांत परिचारक, आ. अभिजीत पाटील, आ. समाधान आवताडे, आ. राजू खरे, आ. बाबासाहेब देशमुख, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचेसह भगीरथ भालके, कल्याणराव काळे, नागेश भोसले, मनसे नेते दिलीप धोत्रे, शिवसेना नेते महेश साठे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहेत. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणारे हे माऊली कृषी प्रदर्शन येथील जनावरांच्या बाजारा लगतच भरवण्यात आले आहे. पंढरपूरसह पंढरपूर शहरात आलेल्या सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक संग्राम गायकवाड आणि वाखरी ग्रामपंचायतीच्या करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form