श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानतर्फे पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत - मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रांताधिकार्‍यांकडे धनादेश सुपुर्द


पंढरपूर, प्रतिनिधी--
श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत करण्यात आली.नुकतेच राज्यात अतिवृष्टी व पूरामुळे अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासनाच्यावतीने त्यांना आर्थिक मदत करण्यात येत आहे. नुकसानग्रस्तांना संकटातून सावरण्यासाठी दानशूर संस्था, मंडळी व व्यक्तींनी मदत करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते.

सदर आवाहनाला प्रतिसाद देत येथील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या सभासदांनी स्वच्छेने वर्गणी जमा करून या रक्कमेचा धनादेश प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी तहसीलदार सचिन लंगुटे हेही उपस्थित होते. सदरचा धनादेश देताना श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे विलास कुलकर्णी, दत्तात्रय माने, विठ्ठल ऐतवडकर, सुधाकर जोशी, डी.व्ही. कुलकर्णी, संतोष कुलकर्णी, पत्रकार मंदार लोहकरे, पत्रकार अतुल बडवे, पत्रकार महेश भंडारकवठेकर, अमित भादुले, चंद्रकांत भागानगरे, गोपाळ तरळगट्टी, दिगंबर सुडके, अजय जाधव, राजेंद्र राऊत, नवनाथ काटे, दादा भुईटे, सुनील भैरवाडे, शिवकुमार भावलेकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form