सोलापूर प्रतिनिधी --
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ मध्य मंडल प्रभाग क्र ९ दाजी पेठ, श्रीराम मंदिर व गांधी नगर नं-२ येथे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान संपन्न!
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत भाजपा सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ- मध्य मंडलात आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या नेतृत्वाखाली व शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांच्या उपस्थितीत सोलापूर महानगरपालिका, सोलापूर राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, बाह्य संपर्क आरोग्य शिबिर जिजामाता व गोलचावडी यु पी एच सी सेंटरच्या वतीने ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ राबविण्यात आले .
या मोफत आरोग्य शिबीरांतर्गत गरोदर माता तपासणी, लहान मुलांचे लसीकरण, मलेरीया, टीबी तपासणी, मधुमेह, बीपी तपासणीसोबतच आरोग्य तज्ञांकडून सकस संपन्न आहार बाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी मा.महिला बालकल्याण समिती सभापती रामेश्वरी आनंद बिर्रू यांनी प्रयत्न केले.
या शिबिराप्रसंगी भाजपा ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू ,मा. नगरसेवक मेघनाथ येमूल, उपाध्यक्ष विजयाताई वड्डेपल्ली, अंबादास बिंगी, कोषाध्यक्ष भूपती कमटम, चिटणीस बजरंग कुलकर्णी,दिलीप पतंगे, नागनाथ सोमा, मध्य मंडल अध्यक्ष नागेश सरगम, अल्पसंख्यांक सेलचे जाकीर सगरी,आनंद बिर्रू, दत्तात्रय पोसा, अनिल वंगारी, मनोहर कोडम, विश्वनाथ बदलापुरे, ज्ञानेश्वर गवते, सदानंद कुडक्याल अनिल व्हनमाने आदीसह प्रभाग ९ मधील भाजपा पदाधिकारी उपस्थितीत होते .
तसेच जिजामाता आरोग्य केंद्राचे आणि गोलचावडी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, बालरोग तज्ञ - डॉ वाले, कान नाक घसा तज्ञ - डॉ भुतडा, अस्थीरोग तज्ञ - डॉ बबलादी, दंतरोग तज्ञ - डॉ शिवगुंडे, डॉ वैशाली मोरे , डॉ. निलोफर ,लता गायकवाड, तनवीर गुलजार व सर्व स्टाफ आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता