पंढरपूर प्रतिनिधी :
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, तसेच महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छता ही सेवा” अभियान २०२५ अंतर्गत राष्ट्र स्वच्छता अभियानाचे आयोजन एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलाश करांडे यांनी दिली.
ही स्वच्छता मोहिम पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त, दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता, "एक दिन, एक घंटा, एक साथ" या संकल्पनेखाली राबवण्यात आली. या उपक्रमात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत राष्ट्र स्वच्छतेची शपथ घेतली.
कार्यक्रमाबाबत माहिती देताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे म्हणाले की, “स्वच्छ भारताच्या दिशेने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उचललेले पाऊल अत्यंत प्रेरणादायी आहे.”
या कार्यक्रमात माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी YouTube मार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्वच्छतेचा संदेश दिला.
स्वच्छता अभियानाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख यांच्यासह प्रा. सुमित इंगोले, प्रा. गुरुराज इनामदार, प्रा. अजित करांडे, प्रा. अर्जुन मासाळ आणि प्रा. सिध्देश्वर गणगोंडा यांनी विशेष योगदान दिले. एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी पूर्ण उत्साहाने सहभाग घेत परिसरात स्वच्छता अभियान राबवले.
हा उपक्रम स्वच्छतेविषयी जनजागृती घडवून आणणारा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारा ठरला.
Tags
शैक्षणिक वार्ता