म्हैसाळ योजनेतील शिरनांदगी व मारोळी येथील तलाव पावसाच्या पाण्यामुळे तुडुंब भरले


मंगळवेढा प्रतिनिधी--
शिरनांदगी तलावाच्या परिसरातील शिरनांदगी, रड्डे चिखलगी निंबोणी या गावांना तलाव भरल्यानंतर आवर्तने सोडण्यासाठी सध्या नादुरुस्त असलेल्या उपवितरिकांची दुरुस्ती करण्यासाठी तसेच म्हैसाळच्या मुख्य कॅनॉल पासून डायरेक्ट शिरनांदगी तलावात पाडणे सोडण्यासाठी पाईपलाईन टाकण्यासंदर्भात येत्या काही दिवसात म्हैसाळच्या अधिकाऱ्यांसमोर बैठक घेऊन या भागातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पाणी मिळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन आमदार समाधान आवताडे यांनी शिरनांदगी, तलाव पाणी पूजन प्रसंगी दिले. 
    
दक्षिण भागातील शिरनांदगी तलाव भरल्यानंतर या भागातील सहा ते सात गावांना शेतीच्या पाण्याची सुविधा होत असते. या तलावातून वर्षाला दोन ते तीन आवर्तने सोडण्याची तरतूद असली तरी गेल्या कित्येक वर्षापासून तलाव भरून देखील या भागातील शेतकऱ्यांना उपवितरिका नादुरुस्त असल्याने तसेच झाडे झुडपे वाढल्यामुळे तलावातून पाणी सोडले जात नाही. परंतु गेल्या काही दिवसापासून हा तलाव म्हैसाळच्या पाणी योजनेतून भरून दिला जातो. या पाण्याचा उपयोग उचल पाणी योजना राबवणाऱ्या शेतकऱ्यांना होत असतो परंतु येथील उपवित्रिका असून अडचण नसून खोळांबा अशी अवस्था असल्यामुळे आमदार समाधान आवताडे यांनी या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी लक्ष घातले आहे. सध्या शिरनांदगी व मारोळी येथील तलाव म्हैसाळ योजनेतील पाण्यामुळे व पावसाच्या पाण्यामुळे सध्या तुडुंब भरला आहे या पाण्याचे पूजन आज दिनांक 26 रोजी आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की शिरनांदगी परिसरातील सात ते आठ गावांना या तलावातील पाण्याचा उपयोग व्हावा यासाठी रड्डे ,शिरनांदगी चिखलगी, निंबोणी या परिसरात असलेल्या नादुरुस्त व झाडे झुडपाणी युक्त असलेल्या उपवित्रिकांची दुरुस्ती करण्यासंदर्भात येत्या काही दिवसात अधिकाऱ्यांसमोर बैठक घेतली जाणार असून या वितरिका चालू केल्या जातील तसेच म्हैसाळ मुख्य कालव्यापासून  ते शिरनांदगी तलावापर्यंत ओढ्याद्वारे पाणी सोडण्याऐवजी पाईपलाईन करून डायरेक्ट शिरनांदगी तलावात पाणी सोडण्याचे नियोजन केले जाणार आहे.त्या दृष्टीने येत्या काही दिवसात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निधीचे नियोजन व आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच मारोली येथील गेल्या 15 वर्षानंतर पहिल्यांदा भरले असून यामुळे याभागातील शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच याभागातील पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार पाहिजे ती मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी प्रदीप खांडेकर ,शशिकांत चव्हाण तानाजी काकडे , अंबादास कुलकर्णी नितीन पाटील, सुरेश ढोणे, जगन्नाथ रेवे पांडुरंग कांबळे यशवंत खताळ शहाजी गायकवाड महादेव खताळ संतोष बिराजदार अंकुश खताळ  सुनील कांबळे विजय थोरबोले दत्ता मैत्री विठ्ठल थोरबोले रमेश काशीद उत्तम थोरबोले सरआणि तहसीलदार मदन जाधव साहेब कृषी अधिकारी मिसाळ मॅडम, म्हैसळ योजनेचे डेप्युटी इंजिनियर गोसावी , राजू सुतार, राजू वाघमोडे,शाखा अभियंता श्री शिंदे भीमा पाटबंधारे विभागाचे डेप्युटी इंजिनियर जाधव ,शाखा अभियंता सरगर साहेब,  महावितरण चे शाखा अभियंता दत्तात्रय आसबे,पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नरळे   ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form