पंढरपूर प्रतिनिधी --
रयत शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालय व ज्यु कॉलेज, भोसे या शाखेत मंगळवार दि.23सप्टेंबर 2025 रोजी कर्मवीर जयंती सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षण महर्षी, पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८व्या जयंती सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय,पंढरपूर येथील प्रा.महादेव जेधे बोलत होते. या प्रसंगी बोलताना प्रा.जेधे यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांचे जीवन व कार्य या सबंधी सविस्तर विवेचन केले. रयत शिक्षण संस्था ही नेहमीच स्वावलंबी शिक्षणाचा पुरस्कार करीत असून,`कमवा आणि शिका ` हे संस्थेचे धोरण प्रभावीपणे वापरले जाते असे सांगून कर्मवीर कसे घडले हे विविध प्रसंग सांगून स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय व स्वातंत्र्य या चतु:सूत्रीचा अवलंब करावा असे आवाहन प्रा. जेधे यांनी विद्यार्थ्यांना केले .
सदरच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोसे गावचे युवा सरपंच तसेच रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य ॲड.गणेश दादा पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे लेखापरिक्षक तथा उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे साहेब उपस्थित होते. तसेच या याप्रसंगी श्री छत्रपती शिवाजी कॉलेज साताराचे उपप्राचार्य माननीय डॉ. रामराजे माने देशमुख यांची विशेष उपस्थिती होती .
सदर कार्यक्रमास भोसे सोसायटीचे चेअरमन रावसाहेब ( तात्या) पाटील,सचिव सुनिल तळेकर,यशवंत पतसंस्थेचे चेअरमन जयवंत गावंधरे,भोसे गावचे उपसरपंच भारत(तात्या )जमदाडे,माजी प्राचार्य नागनाथ काळे,मारुती कारंडे, पांढरे सर,भोसे गावचे प्रगतशील बागाईतदार मोहन ( भाऊ) तळेकर,मारुती ( भाऊ) कोरके, संजय कोरके,तानाजी गावंधरे, सोमनाथ थिटे,नारायण कोरके, अनिल (बापू )कोरके,अण्णा कोरके,हनुमंत थिटे,संभाजी अडगळे तसेच विविध गावचे सरपंच, उपसरपंच, स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन व सदस्य, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व रयत गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक जरे एस. जी. यांनी केले.प्राचार्य कुंभार ए. एल. यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ज्युनिअर विभाग प्रमुख प्राध्यापक नंदकुमार उबाळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी , शिक्षकेतर सेवक बंधू भगिनी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.
Tags
सामाजिक वार्ता