*चमत्कारिक समाधी स्थळ, जिथे सर्व ईच्छा पूर्ण होतात*.
पंढरपूर प्रतिनिधी --
प्राचीन काळापासून आपल्या देशात ऋषीं, साधू संतांना खूप आदर आणि मानसन्मान दिला जातो. देवी देवतांच्या मंदिराबरोबरच सिद्ध पुरुष आणि संतांच्या समाधी देखील बांधण्यात आलेल्या आहेत. त्यापैकीच साधारण पणे सोळाशे वर्षांपूर्वीचे रामलिंग मुदगड येथे श्री. देवाजी बुवा धर्माधिकारी यांची संजीवन समाधी आहे जिथे लोक श्रद्धेने माथा टेकऊन त्यांच्या दुःखापासून मुक्त होतात. रामलिंग मुदगड येथील श्री. देवाजी बुवा धर्माधिकारी यांची अशी एक चमत्कारिक संजीवन समाधी स्थळ आहे जिथे सर्व इच्छा पूर्ण होतात, मागेल ते मिळते याची अनुभूती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही.
विश्वकर्मा वंशिय महान संत श्री. देवाजी बाबा धर्माधिकारी यांची संजीवन समाथी लातूर जिल्हा, निलंगा तालुक्यातील रामलिंग मुदगड येथे आहे. पंढरपूर येथे जसे श्री. संत नरहरी महाराजांचे समाधी मंदिर आहे तदवतच मुदगड येथील रामलिंग मंदिराच्या समोरच श्री देवाजी बाबा धर्माधिकारी व त्यांचे शिष्य श्री. राम बुवा यांचे समाधी मंदिर आहे. यांचबरोबर याच मंदिर परिसरातच पूर्वेकडील बाजूस श्री देविदास बुवांची समाधी आहे.
पंढरपूर येथील श्री. संत नरहरी महाराजांचे समाधी मंदिर जसे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर आहे. तदवतच मुदगड येथील रामलिंग मंदिराच्या समोरच विश्वकर्मा वंशिय महान संत श्री देवाजी बाबा धर्माधिकारी व त्यांचे शिष्य श्री. राम बुवा यांचे समाधी मंदिर आहे. यांचबरोबर पूर्वेकडील बाजूस श्री देविदास बुवांची समाधी आहे. यांचा कालावधी साधारण पणे सोळासे वर्षांपूर्वीचा आहे. असे समजते. माझ्या लहानपणी म्हणजे तिसरी, चौथीत शिकत असताना श्री. देविदास बुवा त्यांच्या शिष्याचें घरी प्रत्येक वर्षी येत. श्री देविदास बुवांची बहीण सौं. सत्यभामा ही माझ्या भुरीकवठे गावाजवळील आलूर गावी श्री. भास्करराव पोतदार यांना दिली होती. बहिणीला भेटायला ते आले की, आमच्या वडिलांना भेटण्यासाठी यायचे. आणि शिष्याचे घरी भेट द्यायचे.शिष्यानी देईल ती मदत, देणगी घेऊन जात. त्यावेळी ते देवाजी बुवांची महत्ती सांगत की, त्याकाळी राजकर्त्याने कर्नाटक राज्यातील मुरझाव मठ येथे महाराजांना तप्त लोखंडी ऐरंणीर उभे करून अनन्वित छळ करण्यात येत असताना सूर्यदेव देखील अस्तास जाणेचे थांबले होते. सूर्य अस्तास जात नसल्याने कोलाहल माजले. कोणत्या तरी महान संतांचा छळ होत असेल म्हणून प्रजेत चर्चा होऊ लागली. शेवटी महाराजांना तप्त ऐरणी वरून खाली उतरविण्यात आले. मग सूर्य अस्तास गेला असे म्हणतात. सर्व भक्त गणांसह भोजनाचे वेळी तूप संपले तेंव्हा महाराजांनी पाण्यानी भरलेले भांडे हातात घेऊन चमत्काराने त्याचे तूप बनवून सर्व भक्तांना वाढले. जप जाप करताना विहिरीतील पाण्यावर घोंगडी टाकून त्यावर बसून करत, पाण्यावरून चालत जायचे. असे एक ना अनेक चमत्कार त्यांनी केलेले आहे. नंतर ते रामलिंग मुदगड येथे आले. त्यांचे चमत्कार याहून हैद्राबादचा निजाम खूष होऊन, " मुहं मांगे मुरादे पुरी करनेवाला देवाजी "असे म्हणून मठाच्या देखभाल व खर्चासाठी वीस एकर जमीन दिल्याचे ते सांगत . श्री. देविदास बुवाच्या आगमनाने घरात आनंद आणि शांतीचा अनुभव मिळत असे. साधू संत येती घरा तोचि दिवाळी दसरा या उक्तीचा अर्थ आता मला अनुभवास येत आहे. त्यांच्या सानिध्यात आणि त्यांच्या सहवासात आनंद अनुभवता येत असे.त्यांच्या आगमनाने घर पवित्र आणि आनंदाने भरून जात होते . संतांच्या भेटीने मिळणारा आनंद हा दसरा, दिवाळी या सणान्च्या पलीकडे जाणारा असतो.साधू संत हे ज्ञानाचे, भक्तीचे आणि प्रेमाचे प्रतीक असल्याने सणाचे खरे महत्व आणि पावित्र्य अनुभवता येते.नंतर साधारण पणे पन्नास एक वर्षांपासून मठाधिकारी नेमलेले नाही. श्री. नागनाथराव महामुनी, कासार शिरशी, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक श्री . वसंतराव पोतदार आलूरकर,, शिवाजीराव पोतदार लोहारा, मनोहर पोतदार, कै.बाबुराव पोतदार मुरूमकर -सोलापूर, पोतदार गुरुजी किल्लारी,श्री. राम पांचाळ रामलिंग मुदगड व गावातील कांही प्रतिष्ठित मंडळींनी मिळून एक ट्रस्ट बनविले आहे. सदर ट्रस्ट मार्फतच सध्या मठाचा कारभार पाहिला जात आहे.
सध्या लातूरचे श्री. नारायणगाव वेदपाठक अध्यक्ष, राम पांचाळ उपाध्यक्ष, वसंतराव पोतदार सचिव म्हणून कारभार पाहत आहेत.प्रतीवर्षी मकर संक्रन्तीच्या दरम्यान सात दिवसाचा भंडारा उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवात मराठवाडा, पुणे, सोलापूर, विजयपूर, कलबुर्गी, याशिवाय तेलंगणा, आंध्र प्रदेशातील सर्व भक्तगणं, सोनार समाज बांधव मोठया संख्याने उपस्थित असतात. श्री. देवाजी बुवा धर्माधिकारी यांची सखोल आणि लिखित स्वरूपातील माहिती उपलब्ध झाली नाही. ट्रस्ट चे उपाध्यक्ष श्री. राम पांचाळ, रामलिंग मुदगड व इंजिनिअर विजयकुमार पोतदार सोलापूर यांचेकडून थोडीफार माहिती मिळाली त्याबद्दल त्यांना धन्यवाद! आणि विश्वकर्मा वंशिय महान संत श्री. देवाजी बुवांचे चरणी शतशः दंडवत.
वसंत पोतदार सोलापूर
मोबाईल 9423065915
Tags
सामाजिक वार्ता