पंढरीतील दारूबंदीसाठी माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांचा पुढाकार ... दारूबंदी विभागाला दिले दारूबंदीचे निवेदन....

पंढरपूर प्रतिनिधी- 
पंढरपूर शहर तसेच इसबावी येथे बनावट देशी विदेशी दारुची विक्री याबाबत उत्पादन शुल्क विभागाने गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष व माजी नगरसेवक विक्रम शिरसट यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
 
पंढरपूर शहर हे तिर्थक्षेत्र असल्याने या शहराचे पावित्र्य जपले जावे अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आली आहे. मात्र शहराच्या विविध भागात हातभट्टी दारु तसेच अवैध दारु विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरातील वाईन शॉप मधून ग्राहकाकडे मद्य खरेदी कुठलेही परमीट न मागता मोठ्या प्रमाणात दारु विक्री होत आहे. तर ढाबे चालक, हॉटेल चालक यांना ठोक स्वरुपात मोठ्या प्रमाणात दारु विक्री केली जात असल्याचे आपणास सदर वाईन शॉप मधील सीसीटीव्ही तपासणी केली असता सहजपणे निदर्शनास येईल.

पंढरपूर शहरात त्याच बरोबर इसबावी येथे बनावट देशी विदेशी दारुचा मोठा साठा करुन विक्री केली जात आहे.त्यामुळे इसबावी व परिसरात रात्री, मद्यरात्री दारु खरेदी करण्यासाठी आलेल्या गर्दीचा व मद्यपींचा मोठा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

राज्यात भाजपची सत्ता असताना पंढरपूरात सुरु असलेल्या या गंभीर प्रकाराबाबत माजी भाजपा शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक म्हणून सामान्य जनता आमचे लक्ष वेधत आहे. तरी सदर गंभीर प्रकाराची दखल घेवून कठोर कारवाई करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form