आधुनिक मुंबईचे शिल्पकार -- नाना शंकरशेट

मुंबई ही मराठी माणसांनीच घडवली....
नाना शंकरशेट पुण्यतिथी विशेष लेख 
१७२ वर्षांपूर्वी, १६ एप्रिल १८५३ रोजी, दुपारी साडेतीन वाजता २१ तोफांची सलामी स्वीकारत मुंबईतील बोरिबंदरहून (म्हणजे तत्कालीन व्हिक्टोरिया टर्मिनस व आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ठाण्याच्या दिशेने भारतातील पहिली रेल्वेगाडी ट्रॅकवरून धावली मुंबई ते ठाणे हा ३२ किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने ५७ मिनिटात पूर्ण केला. पहिल्या रेल्वे प्रवासात तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड यांची पत्नी लेडी फॉकलंड यांच्यासह ४०० प्रवासी होते. त्यात ब्रिटिश अधिकारी, स्थानिक जमीनदार, मुंबईतील प्रतिष्ठित नागरिक यांचा समावेश होता या रेल्वेतल्या एका कंपार्टमेंटला फुलांनी सजवले होते. यात बसण्याचा मान मोजक्याच लोकांना होता, त्यातले एक होते जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे ऊर्फ 'नाना शंकरशेट' त्यांना आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते.

मुंबईच्या विकासातले एक अत्यंत महत्वाचे नाव म्हणजे नाना शंकरशेठ मुंबईत रेल्वे धावण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते मुरबाड येथे जन्माला आलेला एक मुलगा, मुंबईच्या जडणघडणीत त्याने इतके योगदान दिले की, त्यांच्याशिवाय मुंबईचे नाव घेणे अशक्य आहे असे महान कार्य करणारे नाना शंकरशेठ यांची आज पुण्यतिथी नाना शंकरशेठ अर्थात जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी ठाण्यातल्या मुरबाडू इथे झाला. नानांच्या आईचे छत्र त्यांच्या डोक्यावरून लवकर हरपले. एका दैवज्ञ ब्राह्मणाच्या घरी नानांचा जन्म झाला, त्यांच्या वडिलांनी जवाहिऱ्यांचा व्यापारात खूप संपत्ती कमावली होती. नाना वयात येत असतानाच त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. त्यानंतर नानांनी त्यांच्यावर पडलेली जबाबदारी समर्थपणे सांभाळली नानांचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक होता. इंग्रजी शासनाच्या काळात त्यांनी इंग्रजीचे महत्व चांगलेच जाणले होते आणि त्यामुळेच नानांचा जोर इंग्रजी आणि संस्कृत भाषेच्या अभ्यासाकडे असलेला पहायला मिळतो. त्याकाळी इंग्रजी आणि संस्कृत या भाषांच्या वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले.

माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबई इलाख्याचे गव्हर्नर होते. एल्फिन्स्टन यांची नानांची ओळख झाली शिक्षण विषयक कामांमध्ये नानांनी एल्फिन्स्टन यांना मदतीचे आश्वासन दिले आणि त्यांच्या प्रयत्नातूनच १८२२ साली मुंबईची हैंदशाळा व स्कूल बुक सोसायटी'ची स्थापना झाली पाच संस्थेचे पुढे म्हणजे १८२४ साली 'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी'त रूपांतर झाले." नीलेश बने लिहितात, १८१९ मध्ये
'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी ही संस्था मुंबई इलाख्यातील शिक्षण क्षेत्रातील मैलाचा दगड ठरली. पुढे उच्च शिक्षणासाठी 'एल्फिन्स्टन फंड' गोळा केला गेला, त्याचे विश्वस्त नाना शंकरशेट होते. याच निधीतून १८२७ साली पुढे एल्फिन्स्टन हायस्कूल व कॉलेज सुरू करण्यात आले १८४१ साली ते बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या मंडळावर गेले. तिथे सतत १६ वर्षे ते निवडून आले १८४५ साली नानांच्या सहकार्यान ग्रेट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली मुलींसाठी शाळा, विधी महाविद्यालयाचा पाया, अग्रिकल्चर-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया व जिऑग्राफिकल सोसायटी या संस्थांचे प्रमुख, अध्यक्षपद, जे जे. स्कूल ऑफ आर्ट्सच्या स्थापनेत सहकार्य, मुंबई विद्यापीठ... इत्यादींच्या शिक्षण व संस्थात्मक कामात त्यांनी स्वतःला झोकून दिले. वर उल्लेख केल्याप्रमाणे मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ज्या काळात मुलीच्या शिक्षणाला फारसे महत्व दिले जात नव्हते, त्या काळात त्यांचे हे प्रयत्न होते महिलांसाठी त्यांनी प्रसंगी समाजाचा रोषही पत्करला सती प्रथेला त्यांनी केलेला विरोध हे त्यांचे उदाहरण होय ब्रिटिशांनी सुरू केलेल्या रेल्वेची माहिती नाना शंकरशेठ यांना कळली आणि त्यांनी ब्रिटिशांकडे अशीच एक गाडी मुंबईत धावावी यासाठी अर्ज केला त्यानी त्यांचे अत्यंत जवळचे मित्र जमशेटजी जिजिभॉय यांच्याकडे ही कल्पना मांडली व या दोघांनी मिळून १८४५ साली इंडियन रेल्वे असोसिएशनची स्थापना केली त्यांच्या अविरत प्रयत्नांचे फलित म्हणून १ ऑगस्ट १८४९ रोजी द ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वेची स्थापना झाली १६ एप्रिल १८५३ रोजी पहिली रेल्वे बोरिबंदर ते ठाणे अशी धावली व मुंबईच्या विकासात एक महत्वाचा पाया रचला गेला. मुंबईला नानांच्या प्रयत्नांनी वेगवान प्रवास दिला. नानांनी मुंबईच्या विकासासाठी
अनेक जमिनीही दान दिल्या. मुलींसाठी शाळा काढणे, सती प्रथेला कडाडून विरोध करणे त्यासाठी त्या काळातल्या लोकांचा रोष ओढावून घेणे, बॉम्बे म्युनिसिपल कायद्याची रचना करणे अशा अनेक कार्यात नानांनी स्वतःला झोकून दिले होते. नानांच्या या मुंबईवरील प्रेमामुळेच ते १८६२ साली मुंबई प्रांताच्या गव्हर्नरचे सल्लागार म्हणूनही नियुक्त झाले होते. नानांनी मुंबईची खरी ओळख बनवली मुंबईच्या जडणघडणीत नानांचा वाटा अत्यंत महत्वाचा आहे त्यांच्या पाच प्रयत्नांनी मुंबईला वेगवान शहराची ओळख मिळाली. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी तर नानांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांना 'नाना हे मुंबईचे अविभाज्य सम्राट होते' अशा शब्दात त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
 

नाना जगन्नाथ शंकरशेठ यांची पदे.... 
नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचे मुंबई आणि प्रांताच्या विकासासाठी खूप मोलाचे योगदान आहे. त्यांनी भूषविलेल्या काही महत्त्वाच्या पदांची माहिती खालीलप्रमाणे देता येईल.

१) संस्थापक अध्यक्ष - बॉंम्बे असोसिएशन २) सभासद - बोर्ड ऑफ कॉन्झरवंसी ३) उपाध्यक्ष -स्कुल ऑफ इंडस्ट्रीज ४) अध्यक्ष - डेव्हिड ससून रिफॉर्मेटरी इन्स्टिटयूट ५) सदस्य - सिलेक्ट समिती (म्युनसिपल कायदा व बिल) ६) सदस्य - बोर्ड ऑफ एज्युकेशन ७) सदस्य- नेटिव्ह स्कुल बुक सोसायटी ८) विश्वस्त - एल्फिन्स्टन फंड. ९) अध्यक्ष - पोटसमिती (शिक्षण प्रसार समिती ) १०) संस्थापक - जगन्नाथ शंकरशेठ स्कुल ११) संस्थापक सभासद - जे. जे. आर्टस् कॉलेज १२) सदस्य - मुंबई विद्यापीठ व्यवस्थापक मंडळ १३) फेलो -मुंबई विद्यापीठ १४) अध्यक्ष - हॉर्टिकल्चर सोसायटी १५) अध्यक्ष - जिओग्राफिकल सोसायटी १६) डायरेक्टर - बॉंम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी १७) ट्रस्टी - बॉंम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी १८) सदस्य - द इनलॅंड रेल्वे असोसिएशन १९) संचालक /सदस्य - ग्रेट ईस्टर्न रेल्वे २०) आद्य संचालक - रेल्वे (मुंबई ते ठाणे पहिला रेल्वे प्रवास गोल्डन पासने) २१) संचालक - बँक ऑफ वेस्टर्न इंडिया २२) संचालक - कमर्शिअयल बँक ऑफ इंडिया २३) संस्थापक - द मर्कंटाईल बँक ऑफ इंडिया २ ४) संचालक/अध्यक्ष - बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरी (पहिला धर्मार्थ दवाखाना ) २५) अध्यक्ष - बादशाही नाट्यगृह ६) पहिले देशी मॅजिस्ट्रेट १ "जस्टिस ऑफ द पीस", "मुंबईचा अनभिषिक्त सम्राट", "मुंबईचे शिल्पकार" म्हणतात.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form