दि.१८-०६-२०२५ रोजीचा सायंकाळचा व दि. १९-०६-२०२५ रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.
पंढरपूर प्रतिनिधी-
पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांनी आषाढी यात्रेपूर्वी वीज वितरण विभागाकडील दुरुस्तीची कामे हाती घेतले आहेत.
त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभागाकडून वीजपुरवठा खंडित होणार असल्याने तसेच आषाढी यात्रा २०२५ च्या अनुषंगाने जलशुध्दीकरण केंद्र येथील दुरुस्तीची कामे करणे आवश्यक असल्याने दि.१८-०६-२०२५ रोजीचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. व दि. १९-०६-२०२५ रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.
तसेच दि. २०-०६-२०२५ रोजीचा शहरात होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल.तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी जपून वापरावे व नगरपरिषदेस सहकार्य करावे.
Tags
सामाजिक वार्ता